रामा तलांडी हे मागील दहा वर्षापासून बुर्गीचे उपसरपंच होते. ते आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कट्टर कार्यकर्ते होते. यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २०१६ मध्ये बुर्गी पोलीस स्टेशनचे उद्घाटन झाले. यावेळी ते बुर्गी ग्रामपंचायतीचे उपसरपंच हाेते. त्यांनी गाव परिसरातील समस्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्या. रस्ते, पूल व माेबाईल टाॅवर बांधण्याची मागणी केली हाेती. त्याच्या मागणीची दखल घेत उडेरा ते कांदाेळीपर्यंत रस्ता झाला. शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे आणण्यात आले. दुपारी ४ वाजता मृतदेह शवविच्छेदन करुन नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. शवविच्छेदन होईपर्यंत तब्बल चार तास माजी आ. दीपक आत्राम हे एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात थांबून होते. घटनेबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. रामा तलांडी यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, दोन लहान मुले, बहीण, भाऊ असा परिवार आहे.
माजी उपसरपंचाच्या हत्येमुळे बुर्गीत दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST