शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

एकाच डॉक्टरवर आरोग्य सेवेचा भार

By admin | Updated: April 2, 2015 01:48 IST

दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासीबहुल अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा भागात आरोग्याच्या खासगी सोयीसुविधा नाही.

जिमलगट्टा : दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासीबहुल अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा भागात आरोग्याच्या खासगी सोयीसुविधा नाही. त्यामुळे जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. गट ‘ब’ च्या एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर या केंद्राच्या आरोग्य सेवेचा भार आहे. गट ‘ब’ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांढरे हे जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत आहेत. या ठिकाणचे गट ‘अ’ चे एमबीबीएस पदवीधारक वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद भरल्याचे शासनाकडून दाखविण्यात आले आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून गट ‘अ’ च्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. परिणामी येथील आरोग्य सेवा ढासळली आहे. यासंदर्भात जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडे अनेकदा रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद तत्काळ भरण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र शासन व प्रशासनाने या ठिकाणचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे रिक्त पद भरण्यात आले नाही. येथे असलेल्या एकाच डॉक्टरला अनेक बैठकांसाठी जिल्हा मुख्यालयी जावे लागते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अनेक रुग्ण पुरेशा औषधोपचाराअभावी परत जातात. रिक्त पद न भरल्यास केंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते पुलयाजी वेलादी यांनी दिला आहे. (वार्ताहर)