शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अटी व शर्तींच्या अधीन धावणार बैल

By admin | Updated: December 6, 2014 01:35 IST

ग्रामीण भागातील उत्सव मानला जाणाऱ्या बैलांच्या शर्यतीना पूर्ववत केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अनेक अटी व शर्ती लादून मंजुरी देण्याचे ठरविले आहे.

देसाईगंज : ग्रामीण भागातील उत्सव मानला जाणाऱ्या बैलांच्या शर्यतीना पूर्ववत केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अनेक अटी व शर्ती लादून मंजुरी देण्याचे ठरविले आहे. या निर्णयामुळे झाडीपट्टीतील पट शौकीनांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा व तामिळनाडू या राज्यांमधील ग्रामीण भागात बैलांच्या शर्यती मोठ्या प्रमाणात लावण्यात येतात. मात्र पशुप्रेमींनी बैलांना इजा होत असल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. याला अनुसरून केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने बैलांच्या शर्यतींना पूर्णपणे बंदी आणली होती़ यामुळे गावात होणाऱ्या शर्यतीच्या उत्सवावर विरजन पडले. मात्र विविध अटी व शर्ती ठेऊन पर्यावरण विभागाने या शर्यती पून्हा होणार असल्याचे जाहीर केले़ अटी व शर्ती जाहीर केल्या नसल्या तरी बैलांना ईजा होणार नाही, बैलांवर जुगार लावता येणार नाही आदी अटींचा समावेश राहू शकतो. कोणत्याही प्रकारचा व्यापारी दृिष्टकोन न ठेवता बैलांच्या शर्यती घेण्यात याव्या, असे पर्यावरणवाद्यांंना देखील वाटते़ मात्र महाराष्ट्रातील शंकरपटांना जुगाराचे रूप आल्यामुळे या अटी व शर्ती कितपत पाळल्या जातात, हे येणारा काळच ठरविणार आहे.मागील कित्येक शतकांपासून ग्रामीण भागात बैलांच्या शंकरपटांची परंपरा जोपासली जात आहे. शंकरपटांसाठी बैलांना चांगल्या प्रतीचा आहार देऊन पटासाठी तयार केले जाते़ मात्र २०१२ पासून शासनाने शंकरपटावर बंदी आणल्याने ग्रामीण भागातील परंपराच लयास जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र पर्यावरण विभागाने शर्यतींना दिलेल्या परवानगीच्या संकेतामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शंकरपटांवर आलेल्या बंदीमुळे अप्रत्यक्षरित्या बैलांच्या संगोपनाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. गावात बाहेरगावाहून पाहुणे आल्यामुळे मुले-मुली पाहण्याचा योग सुध्दा येते़ लग्नाच्या चर्चा शंकरपटाच्या निमित्ताने जुळून येत होत्या़ (वार्ताहर)