शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत ३० फूट खोल विहिरीत पडलेल्या गोऱ्ह्याला वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:21 IST

दोन गोऱ्ह्याच्या भांडणात एक गोऱ्हा (बैल) विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर कोरची येथील ग्रामस्थांनी त्याला अवघ्या तासाभरात बाहेर काढण्यात यश मिळवले.

ठळक मुद्देग्रामस्थांनी घेतले अथक परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: दोन गोऱ्ह्याच्या भांडणात एक गोऱ्हा (बैल) विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर कोरची येथील ग्रामस्थांनी त्याला अवघ्या तासाभरात बाहेर काढण्यात यश मिळवले.शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास कोरची येथील मुख्य मार्गावर असलेल्या वळणावरील बाबा ताज ढाबा येथील आवारात ही विहीर आहे. सकाळच्या वेळी दोन बैलांमध्ये झटापट सुरू झाली. त्यादरम्यान एक बैल विहिरीत पडला. या विहिरीला जाळीचे झाकण होते. मात्र त्याच्या वजनाने हे झाकणही तुटले व गोऱ्हा पाण्यात कोसळला. ही घटना घडल्याचे दिसताच जवळपासचे नागरिक तिथे धावले.ही विहीर जवळपास ३० फूट खोल होती. या बैलाला बाहेर काढण्यासाठी विविध प्रयत्न सुरू झाले. आधी विहिरीत लाकूड टाकण्यात आले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अखेरीस नगरपंचायतीचे सफाई कामगार दयाराम मडावी व ढाबा मालक वसीम शेख हे दोघेही दोर घेऊन विहिरीत उतरले. त्यांनी या बैलाला दोराने बांधले. व विहिरीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी दोर वर खेचून बैलाला बाहेर काढले.यावेळी कोरचीचे नगराध्यक्ष नसरुद्दीन भामाणी, गोपाल शेंद्रे, कादीर अंसारी, मोहन वाल्दे आदी नागरिकांनी मदतीचा हात दिला.

टॅग्स :Socialसामाजिक