शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोरची : येथील भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडचे तीन टॉवर व कार्यालयाचा वीज पुरवठा थकीत वीज बिलामुळे ...

ठळक मुद्दे२ लाख ५६ हजारांचे बिल थकीत : दोन टॉवरची दूरसंचार सेवा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : येथील भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडचे तीन टॉवर व कार्यालयाचा वीज पुरवठा थकीत वीज बिलामुळे खंडित करण्यात आला आहे. परिणामी दोन टॉवरवरील बीएसएनएल सेवा प्रभावित झाली आहे. बीएसएनएलने वीज बिल न भरल्यामुळे १७ जानेवारीपासून टॉवर व कार्यालयातील वीज पुरवठा पूर्णत: बंद आहे.कोरची शहर व तालुक्यात बीएसएनएलची भ्रमणध्वनीसेवा आहे. बीएसएनएल व्यतीरिक्त या तालुक्यात दुसरे नेटवर्क नाही. कोरची शहरासह बेतकाठी व ग्रामीण भागातील बीएसएनएल सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनीधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. बीएसएनएलचे कोरची येथील दोन्ही कार्यालय व तीनही टॉवरचे मिळून एकूण २ लाख ५६ हजार रूपयांचे दोन महिन्यांचे वीज बिल प्रलंबित आहे. वीज बिल भरण्यासंदर्भात महावितरणच्या वतीने अनेकदा सूचित करण्यात आले. मात्र वीज बिलाचा भरणा न केल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी बीएसएनएल सेवा प्रभावित झाली आहे.कोरची तालुक्यातील बीएसएनएलची सेवा वारंवार खंडित होत असल्यामुळे बीएसएनएल ग्राहकांना नेहमीच असुविधेचा सामना करावा लागतो. बीएसएनएलच्या या ढिसाळ कारभाराप्रती बीएसएनएलच्या ग्राहकांनी रोष व्यक्त केला आहे. कुरखेडा व देवरी मार्गावर मुख्य कार्यालयाजवळ बीएसएनएलचे एक टॉवर आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात दुसरे तर बेतकाठी येथे तिसरे टॉवर आहे. दोन टॉवरची सेवा बंद आहे. परिणामी भ्रमणध्वनीधारकांना त्रास होत आहे.कोटगूल येथे क व्हरेजची समस्या गंभीरकोटगूल येथील बीएसएनएलचा टॉवर सॅटेलाईटवर चालविण्यात येत आहे. मात्र या टॉवरचे बीटीएस व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेजची समस्या अतिशय गंभीर आहे. कोटगूल गावाची लोकसंख्या १ हजार पेक्षा कमी आहे. या ठिकाणी मोबाईल वापरणाऱ्यांचीही संख्या कमी आहे. तरीही कव्हरेज पुरत नाही. या ठिकाणी पोलीस मदत केंद्र आहे. सीआरपीएफ, एसआरपीएफचे जवान कार्यरत आहेत. मोबाईलचा कव्हरेज राहत नसल्यामुळे आप्तजणांसोबत संपर्क साधणे कठीण होत आहे. इंटरनेटची स्पिड अतिशय कमी आहे. सोबतच फोनही लागत नाही.महावितरणच्या वीज बिलाचा भरणा लवकरच करण्यात येईल. वीज बिल भरल्यानंतर टॉॅवरवरून बीएसएनएलची सेवा लगेच सुरू करण्यात येईल. आमचा प्रयत्न सुरू आहे.- प्रफुल कुलसंगे, कनिष्ठ अभियंता, ३३ के व्ही वीज उपकेंद्र, कोरची

टॅग्स :BSNLबीएसएनएल