शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीला एफडीसीएमचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:40 IST

ऑनलाईन लोकमतवैरागड : कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, वाढोणा, भगवानपूर येथील नागरिकांनी एफडीसीएमच्या वृक्षतोडीविरोधात एल्गार पुकारला होता. त्यानंतर मंगळवार १३ मार्चला आ. कृष्णा गजबे व एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत पुढील निर्णयापर्यंत वृक्षतोड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर शिरपूर जंगलात एफडीसीएमने केलेल्या वृक्षतोडीची पाहणी व चौकशी आ. कृष्णा गजबे व नागरिकांनी केली ...

ठळक मुद्देआमदार व अधिकाºयांची बैठक : पुढील निर्णयापर्यंत वृक्षतोड बंद राहणार

ऑनलाईन लोकमतवैरागड : कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, वाढोणा, भगवानपूर येथील नागरिकांनी एफडीसीएमच्या वृक्षतोडीविरोधात एल्गार पुकारला होता. त्यानंतर मंगळवार १३ मार्चला आ. कृष्णा गजबे व एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत पुढील निर्णयापर्यंत वृक्षतोड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर शिरपूर जंगलात एफडीसीएमने केलेल्या वृक्षतोडीची पाहणी व चौकशी आ. कृष्णा गजबे व नागरिकांनी केली असता, एफडीसीएमने केलेली वृक्षतोड पाहून आमदारही अवाक् झाले.वनविकास महामंडळाने अशाच ठिकाणची वृक्षतोड करायची आहे, ज्या जंगलातील वृक्षांची घनता ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यातही जी झाडे परिपक्व व पोकाळ आहेत, अशाच वृक्षांची तोड करायची असताना जे जंगल घनदाट आहे, त्या जंगलातील संपूर्ण लहान-मोठ्या झाडांची कत्तल एफडीसीएमने सुरू केली आहे. ज्या गावांचा पेसाअंतर्गत समावेश होतो. अशा गावाच्या परिक्षेत्रातील वने, वन्यप्राणी व जैवविविधता यांच्यावर प्रतिकूल परिणाम करणारी कृती करता येत नसतानाही एफडीसीएमने कायदा हातात घेऊन जंगलातील बेसुमार कत्तल केली. त्यामुळे एफडीसीएमच्या अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिरपूरचे उपसरपंच रमेश बावनथडे यांनी केली आहे.राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बरोबर ग्रामसभांची बैठक आ. कृष्णा गजबे यांच्या मध्यस्तीने आयोजित करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. तोपर्यंत एफडीसीएम शिरपूर जंगलातील वृक्षतोड करणार नाही आणि लाकडाची वाहतूकही करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे मागील वर्षीही वैरागड परिसरात एफडीसीएममार्फत अवैध वृक्षतोड सुरू करण्यात आली. याला स्थानिकांनी विरोध केला होता.मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणारपेसा अंतर्गत वनहक्काची बेसुमार वृक्षतोड करण्यासाठी ग्रामसभांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे एफडीसीएमची तक्रार राज्यपाल व मानवी हक्क आयोग यांच्याकडे करण्यात येईल, अशी माहिती सरपंच शिवलाला मडावी, उपसरपंच रमेश बावनथडे, नुसाराम कोकोडे, खालील शेख, प्रेम गावडे, लोकेश लाडे, रवींद्र मडावी, नंदू मेश्राम, गजानन सयाम, तेजराम गावडे, अरूण दुमाने, रमेश मस्के, उपसपंच कावळे, चरण उसेंडी यांनी दिली.

टॅग्स :forestजंगल