शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात प्राणहिता नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 13:25 IST

अहेरीजवळील वांगेपल्ली गावालगत प्राणहिता नदीपात्रात महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्य्यात आले आहे. बहूप्रतिक्षित पुलाचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होणार असून येत्या काही दिवसात सर्व सामान्य जनतेसाठी हा खुला होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे१० दिवसात होणार काम पूर्णरस्त्याच्या कामालाही सुरुवातपावसाळ्यात गैरसोय थांबणारअहेरीची बाजारपेठ होणार महत्वाची

प्रतीक मुधोळकरलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: अहेरीजवळील वांगेपल्ली गावालगत प्राणहिता नदीपात्रात महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्य्यात आले आहे. बहूप्रतिक्षित पुलाचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होणार असून येत्या काही दिवसात सर्व सामान्य जनतेसाठी हा खुला होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणारा या पुलाचे बांधकाम तेलंगणा राज्य करीत आहे. चोवीस पिल्लर व अंदाजित नव्वद कोटी किंमत असलेल्या हा पूल हा दोन राज्याला जोडणारा असून येत्या पावसाळ्यात नागरिकांना या पुलावरून सीमापार करता येणार आहे.प्राणहिता नदीवर आधी पूल नसल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नावेने प्रवास करावा लागत होता. काहींना दुचाकीवरून प्रवास करताना नदीत बुडून मृत्यूला ही सामोरे जावे लागले आहे. तेलंगणा राज्याततील गुडेम, कवटाला, बेज्जूर,सिरपूर, कागजनगर हे महत्वाचे गावे अहेरी शहरापासून ७० किमी अंतराच्या वर्तुळात आहे. विशेष म्हणजे अहेरी उपविभागीय जनतेला नजिकचे रेल्वे स्थानक आधी बल्लारपूर होते मात्र पूल पूर्ण झाल्यामुळे सिरपूर कागजनगर हे रेल्वे जंक्शन हे सर्वात जवळ असणार आहे.महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील नागरिकांचे रोटी व बेटीचे व्यवहार आणखी घनिष्ठ होणार आहे. महाराष्ट्र राज्यालगत असलेल्या तेलंगणा राज्यातील अनेक गावातील नागरिक खरेदीसाठी अहेरी बाजारपेठेत येत असतात आणि अहेरी परिसरातील अनेक विवाह संबंध व नातेसंबंध तेलंगणा राज्यात जुळून आहे.तेलंगणाचे आमदार कोनेरू कोनप्पा यांनी या पुलाच्या बांधकामांसाठी विशेष प्रयत्न केले व मागील फडणवीस सरकार कडून ही सहकार्य केले गेले होते.येत्या दहा ते पंधरा दिवसात पुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे आणि पुलापासून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम ही सुरू झाले आहे. पावसाळ्यात होणारी नागरिकांची गैरसोय आता थांबणार आहे.मात्र सध्या कोरोनाचे सावट असल्याने राज्याच्या सीमा सील आहेत त्यामुळे दोन्ही राज्याच्या नागरिकांना प्रत्यक्षपणे व्यवहार आणि ये जा करण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.

टॅग्स :riverनदी