शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लुटेरी दुल्हनचा सापळा : मॅटरिमनी साईटवरून लग्न, नंतर फसवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:49 IST

लग्नाच्या नावाखाली होतेय फसवणूक : लग्न संकेतस्थळावरून वधू शोधणे ठरतेय धोक्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लग्नाचे वय निघून गेल्यानंतर नातेवाइकांत, समाजात संबंध जुळणे कठीण होते. अशा स्थितीत मॅटरमनी साइडचा वापर केला जातो. त्यावर आपल्यासाठी जोडीदार शोधण्यात येतो. या जोडीदाराबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही. स्थळ जोडण्यासाठी आलेली मंडळी बोलण्यातून मुलाकडच्यांना प्रभावित करतात. त्यामुळे फार चौकशी करण्याचाही वेळ मुलाला मिळत नाही. तसेच वय वाढले असल्याने आता आणखी चौकशी का, असे म्हणत संबंध जोडला जातो. कमी कालावधीतच लग्न काढण्यात येते आणि नंतर मुलाकडून मिळालेल्या भेटवस्तू, रोख, दागिने हे घेऊन नवरी नातेवाइकासह पसार होते.

फसवणुकीचे नवीन तीन प्रकार गुन्हेगारांकडून वापरले जात आहे. त्यामुळे मॅटरमनी साइड सुरक्षित आहे असे म्हणता येणार नाही. येथूनच दीर्घकाळ लग्नाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांचा शोध घेतला जातो. बऱ्याचदा मुलीला उच्चपदस्थ नोकरी असल्याची बतावणी केली जाते. नंतर पस्तावा करण्याची वेळ ओढवते. मागील पाच महिन्यांत जिल्ह्यात अशी तक्रार दाखल नाही. मात्र भविष्यात अशा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी सावध असण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे.

पुनर्विवाह करणाऱ्यांना बसतो सर्वाधिक धोकापुनर्विवाह करणारा युवक अलगद जाळ्यात सापडतो. असेच सावज हेरून या टोळ्या संबंध जुळवितात. प्रेमाने दागदागिने घेऊन नंतर संधी मिळताच नवरीसह तेथून पसार होतात, असे प्रकार मोठ्या शहरांमध्ये वाढत आहेत. 

पाच महिन्यांत एकही गुन्हा दाखल नाही

  • लग्न करून नवऱ्याची फसवणूक करणाऱ्या मुर्लीच्या टोळ्याच सक्रिय झाल्या आहे. गडचिरोली जिल्ह्यात पाच महिन्यांत असा एकही गुन्हा नाही.
  • महानगरांमध्ये लुटेरी दुल्हनचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. ग्रामीण भागात शक्यतोवर संपूर्ण माहिती घेऊनच लग्न केले जातात.
  • फसवणूक झालेल्यांकडून बऱ्याचदा 3 त्याची वाच्यता केली जात नाही. त्यामुळे रेकॉर्डवर येत नाही.
  • सध्या मोठ्या शहरांमध्ये सुरू असलेला हा प्रकार गडचिरोली जिल्ह्यातही सुरू होऊ शकतो.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीfraudधोकेबाजी