शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

दारू व तंबाखूच्या बेड्या तोडून फेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:06 IST

गडचिरोली जिल्ह्यात कायदेशीर दारूबंदी आहे. सोबतच सुगंधित तंबाखूयुक्त पदार्थांवरही बंदी आहे. पण चोरून लपून दारूची विक्री होत असल्याने लोक अवैध दारूच्या आहारी जात आहे. महिलांना मारझोड सहन करावी लागत आहे. त्याचबरोबर खर्रा पदार्थाचे व्यसन वाढत चालले आहे.

ठळक मुद्देअभय बंग यांचे आवाहन : भामरागडात व्यसनमुक्ती संमेलन, शाळेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कायदेशीर दारूबंदी आहे. सोबतच सुगंधित तंबाखूयुक्त पदार्थांवरही बंदी आहे. पण चोरून लपून दारूची विक्री होत असल्याने लोक अवैध दारूच्या आहारी जात आहे. महिलांना मारझोड सहन करावी लागत आहे. त्याचबरोबर खर्रा पदार्थाचे व्यसन वाढत चालले आहे. या व्यसनामुळे लोक आणखी गरीब तर होत आहेच पण कॅन्सर या रोगाच्याही आहारी जात आहे. या दोन्ही पदार्थाचे सेवन थांबवून भामरागड तालुक्याच्या समृद्ध निसर्गात निरोगी जगण्यासाठी दारू व तंबाखूच्या बेड्या तोडून फेकुया, असे आवाहन डॉ. अभय बंग यांनी केले.शनिवार भामरागड येथे मुक्तिपथ तालुका कार्यालयाद्वारे आयोजित व्यसनमुक्ती संमेलनात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी आमदार हिरामन वरखडे, सामाजिक कार्यकर्ते सीताराम मडावी, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, पोलीस निरीक्षक संदीप भांड, डॉ.आनंद बंग, मुक्तिपथचे संचालक मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, नगराध्यक्ष संगीता घाडगे, पं. स. सदस्य गोईताई कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते. दारू आणि सुगंधित तंबाखूवर बंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध मार्गाने या दोन्ही पदार्थाची विक्री होत आहे. त्यामुळे या दोन्ही पदार्थांना दूर सारण्यासाठी आवश्यक उपायांवर यावेळी चर्चा झाली.पुढे बोलताना डॉ. बंग म्हणाले, आदिवासीं गावांना पेसा कायद्याद्वारे ग्रामसभेत स्वहिताचा निर्णय घेण्याचा अधिकार मिळालेला आहे. या अधिकाराचा वापर करून भामरागड तालुक्यातील गावांनी गाव पातळीवर दारू व खर्राविक्री बंदीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. नवऱ्याच्या दारू व्यसनाचा त्रास महिलांना सहन करावा लागतो. पेसा अंतर्गत महिलांना विशेष ग्रामसभा घेण्याचा अधिकार आहे. हा अधिकार वापरून दारू गावातून हद्दपार करण्याचा निर्णय महिलांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.पोलीस निरीक्षक संदीप भांड यांनी गाव संघटनांना आश्वासन देत म्हणाले, तालुक्यातील दारूविक्री बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील. विक्रेत्यांवर कारवाईसाठी पोलीस विभाग सदैव तत्पर असल्याचे ते यावेळी म्हणाले. ८० गावांतील जवळपास २०० कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शासकीय आश्रमशाळा, लोकबिरादरी प्रकल्प आणि जि. प. शाळा कोयनगुडा येथील विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य आणि गाणी यावेळी सादर केली. संचालन संतोष सावळकर यांनी तर आभार मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रेरक चिन्ना महाका, आबिद शेख, गिरीश कुलकर्णी, विनीत पद्मावार, लीलाधर कासारे यांनी सहकार्य केले.मोहाची दारू न पिता पदार्थ बनवून खा- वरखडेमोहाच्या दारूला धर्मात स्थान असल्याच्या अपप्रचाराबाबत माजी आमदार हिरामन वरखडे म्हणाले, गोंडी धर्मात मोहाच्या दारूला कुठेही स्थान नाही. या धर्माचे धर्मगुरू पारी कुपारलिंगो यांनीच स्वत: दारूला विरोध केलेला आहे. पण दारू पिण्याच्या लालसेपोटी आज दारू आमच्या धर्मात सांगितली असल्याचा अपप्रचार काही जण करीत आहे. सोबतच मोहाचे अनेक चांगले उपयोग आज आदिवासी विसरत चालला आहे. त्यामुळे मोहाची दारू न पिता त्याचे अनेक पदार्थ बनवून खावे, असे आवाहन वरखडे यांनी केले. यावेळी त्यांनी वाढलेल्या मोहफूल दारूविक्रीबाबत नाराजी व्यक्त करून यासाठी पोलिसांकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे म्हणाले.