शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

मासिक सभेवर सदस्यांचा बहिष्कार

By admin | Updated: December 2, 2015 01:34 IST

स्थानिक पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी हे कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प होते.

पत्रकार परिषद : बीडीओ गैरहजर राहत असल्याचा आरोपचामोर्शी : स्थानिक पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी हे कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प होते. परिणामी जनतेची कामे होत नाही. तसेच मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहात बोलाविण्यात आलेल्या मासिक सभेलाही संवर्ग विकास अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे बीडीओंच्या गैरहजेरीच्या मुद्यांवरून सर्व पं. स. सदस्यांनी मंगळवारच्या मासिक सभेवर बहिष्कार टाकला.कार्यालयात अनेकदा गैरहजर असणाऱ्या तसेच मंगळवारच्या मासिक सभेला गैरहजर राहणाऱ्या चामोर्शीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी चामोर्शी पं. स. च्या १० सदस्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.या पत्रकार परिषदेत अनेक पं. स. सदस्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या असंख्य तक्रारींचा पाडा वाचला. सतत गैरहजर राहणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसणे, कार्यालयात गोंधळ असणे, संविधान दिवसाला स्वत: गैरहजर राहणे, असे प्रकार चामोर्शीच्या बीडीओंकडून वारंवार सुरू असल्याची माहिती पं. स. सदस्यांनी दिली. पत्रकार परिषदेला पं. स. सदस्य प्रमोद भगत, पं. स. सभापती शशी चिळंगे, उपसभापती मंदा दुधबावरे, सदस्य वर्षा भांडेकर, केशव भांडेकर, सुरेंद्र सोमनकर, रूपाली निखाडे, रमेश दुर्गे, सावित्री घरामी, कल्पना कोडाप आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)