शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' दोघींनी दाखवली हिंमत अन् जंगलातील झाडाखालीच केली महिलेची प्रसुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 21:20 IST

घनदाट जंगल आणि त्यात भरून वाहणारा नाला, पुढे जाण्यासाठी रस्ता नको, अशाही कठीण परिस्थितीत हतबल न होता एका आदिवासी महिलेची भर जंगलात एका झाडाखाली प्रसुती झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात घडली.

ठळक मुद्देपूल आणि रस्त्याअभावी रुग्णवाहिका जाण्यास अडचण

प्रतीक मुधोळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : घनदाट जंगल आणि त्यात भरून वाहणारा नाला, पुढे जाण्यासाठी रस्ता नको, अशाही कठीण परिस्थितीत हतबल न होता एका आदिवासी महिलेची भर जंगलात एका झाडाखाली प्रसुती झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात घडली.गट्टा आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या झारेवाडा गावातील आदिवासी महिला भारती सुरज दोरपेटी या गरोदर महिलेला १२ ऑगस्ट रोजी पोटात दुखणे सुरू झाले. प्रसुतीचे ते संकेत असल्याचे लक्षात येताच गावातील आशा सेविका सविता आलाम यांनी गट्टा आरोग्य केंद्राला त्याबाबत माहिती दिली. गट्टा केंद्राच्या कंत्राटी आरोग्य सेविका सोनी दुर्गे, आशा सेविका सविता आलाम व रुग्णवाहिका चालक हे त्या गरोदर महिलेला आणण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यात असलेला गिलनगुडा नाला भरून वाहात होता. त्यावरील रपट्यावरूनही पाणी वाहात होते. अशातही रूग्णवाहिका टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या रपट्यावर एक मालवाहू ट्रक फसला होता. त्यामुळे रुग्णवाहिका झारेवाडा गावाजवळ नेणे शक्य नव्हते.

झारेवाडा गावात जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका जाणे शक्य नव्हते. त्यामुळे पायवाटेने सदर महिला कर्मचारी गावात पोहोचल्या. गरोदर महिलेला खाटेवर टाकून घनदाट जंगलातून मुख्य रस्त्याकडे ते रुग्णवाहिकेच्या दिशेने निघाले. पण यादरम्यान भारतीच्या प्रसुतीकळा आणखीच वाढल्या. आता रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचणे शक्य नाही हे लक्षात येताच आरोग्य सेविका सोनी दुर्गे व आशा सेविका सविता आलाम यांनी प्रसुतीसाठी लागणाऱ्या आपल्या साहित्यासह जंगलातच प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. काही वेळातच त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्या गरोदर महिलेने एका कन्येस जन्म दिला. त्यानंतर नवजात बाळासह त्या मातेला पुढील उपचारासाठी गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

आरोग्य सेविका दुर्गे आणि आशा सेविका आलाम यांनी वेळीच धावपळ केली नसती तर बाळाच्या आणि भारतीच्या जीवास धोका निर्माण झाला असता. विपरित परिस्थितीवर मात करून दिलेल्या त्यांच्या सेवेचे परिसरात कौतुक होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य