शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाडवाही नाल्यावरील दोन्ही बंधारे कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:55 IST

आरमोरी तालुक्यातील वडेगाव, मेंढा व परिसरातील शेतजमिनीला सिंचनाची सोय व्हावी, यासाठी नाडीवाही नाल्यावर पाच वर्षांपूर्वी दोन मोठे सिमेंट काँक्रीटचे बंधारे बांधण्यात आले. मात्र सद्य:स्थितीत या बंधाºयात पाण्याची साठवण झाली नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे लाखोंचा खर्च पाण्यात : धानपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी तालुक्यातील वडेगाव, मेंढा व परिसरातील शेतजमिनीला सिंचनाची सोय व्हावी, यासाठी नाडीवाही नाल्यावर पाच वर्षांपूर्वी दोन मोठे सिमेंट काँक्रीटचे बंधारे बांधण्यात आले. मात्र सद्य:स्थितीत या बंधाºयात पाण्याची साठवण झाली नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे शेतकरी अंतिम टप्प्यात असलेल्या आपल्या शेतजमिनीतील धान पिकाला वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. परिणामी नाडवाही नाल्यावरील दोन्ही बंधारे कुचकामी ठरले असून यावरील लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.नाडवाही नदीवजा नाला असून हा नाला असून परिसरातील शेतकºयांसाठी वरदान ठरणारा आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता पाण्याची साठवण व्हावी, यासाठी मेंढा, झेंडेपार गावादरम्यान नाडवाही नाल्याच्या पुलावरील वरच्या बाजूस लाखो रूपये खर्च करून दोन सिमेंट काँक्रीट बंधारे बांधण्यात आले. मात्र या दोन्ही बंधाºयात सध्या पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे या बंधाºयावरील लाखो रूपयांचा खर्च व्यर्थ गेला आहे. जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग वडसा यांच्यामार्फत बांधण्यात आलेल्या या साठवण बंधाºयावरील लोखंडी पत्रे गायब झाली आहेत. तर काही पत्रे इतर पत्रे पडलेले आहे. सिंचन उपविभागामार्फत बंधाºयाचे काम पूर्ण झाल्यानंतर या बंधाºयाच्या देखभालीकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले. अधिकारी व राजकीय पदाधिकाºयांचेही या समस्येकडे कायम दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता मागील महिन्यापासून पाऊस न झाल्याने कमी मुदतीच्या धान पिकाला धोका निर्माण झाला आहे. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या बंधाºयातून एक हेक्टर क्षेत्राला सिंचन व्यवस्था होत नसल्याने शेतकºयांचे हातात येणारे पीक नष्ट होणार आहे.