काही शेतकऱ्यांचे ऑनलाईन सातबारा केल्यानंतर लिस्टमध्ये नाव आले नाही. तसेच अधिकारात नसलेल्या गावातील शेतकऱ्यांचे नाव लिस्टमध्ये होते. त्या सर्व सातबाराची तपासणी नायब तहसीलदार दुधबळे यांनी केली. त्यात शेतकऱ्यांना टोकणच दिलेले नसल्याचे निदर्शनास आले. सातबारानुसार घेतलेल्या यादीची प्रसिद्धी केली नाह . कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन्ही गोडाऊनमध्ये धान भरलेले आहे ते केव्हा खरेदी केले याची चौकशी करण्यात यावी अशी सूचना आमदार डॉ.होळी यांनी केली. खरेदी केलेले धानाचे सातबारा खरेदी केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले नाही.
ना.तहसीलदार दुधबळे यांनी सर्व सातबाराची तपासणी केली असता त्यामध्ये बराच गैरप्रकार लक्षात आला. त्याठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांनी सातबारा देऊनही त्यांचा नंबर लागलेला नव्हता. काही व्यापाऱ्यांचा नंबर नंतर असूनही त्यांचे धान खरेदी करण्यात आले. आमदारांनी या प्रकाराची योग्य तपासणी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी सूचना नायब तहसीलदारांना केली. आता आष्टी येथील दोन्ही धान खरेदी केंद्रावरील निरीक्षकांवर काय कारवाई होते याकडे आष्टीवासीयांचे लक्ष लागले आहे.