शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:55 IST

तालुक्यातील बेलगाव येथे पाहुणा म्हणून आलेल्या युवकाचा मृतदेह बुधवारी गावाशेजारच्या नाल्यात पुरलेल्या स्थितीत आढळून आला. सुरेश सोनसाय धुर्वे (२५) रा. बोगाटोला पो. कोटरा ता. कोरची असे मृतकाचे नाव आहे.

ठळक मुद्देशिकारीसाठी लावलेल्या करंटने मृत्यू : पाच जण पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : तालुक्यातील बेलगाव येथे पाहुणा म्हणून आलेल्या युवकाचा मृतदेह बुधवारी गावाशेजारच्या नाल्यात पुरलेल्या स्थितीत आढळून आला.सुरेश सोनसाय धुर्वे (२५) रा. बोगाटोला पो. कोटरा ता. कोरची असे मृतकाचे नाव आहे. तो बेलगाव येथील नातेवाईक मनोज कोल्हे यांच्या घरी २२ डिसेंबर रोजी पाहुणा म्हणून आला होता. रात्री जेवन आटोपल्यानंतर फिरून येतो म्हणून घरून निघाला. मात्र रात्री उशीरापर्यंत परत आलाच नाही. त्याची शोधाशोध केली असता, तो दिसला नाही. मंगळवारी तो बेपत्ता असल्याची तक्रार कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. बुधवारी गावात पोलो पाळत सर्व गावकऱ्यांनी गावाशेजारी जंगलात शोधमोहीम राबविली.यावेळी वाघेडा हद्दितील जंगलात एका ठिकाणावरून काही तरी वस्तू फरफटत नेल्याचे दिसून आले. फरफटत नेल्याच्या खुणा नाल्यापर्यंत गेल्या. नाल्यात काही तरी पुरले असावे, असा संशय नागरिकांना आला.पोलिसांनी घटनास्थळ गाठून खोदकाम केले. यावेळी दोन फूट खोलात सुरेशचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर करंटने भाजल्याच्या खुणा होत्या. जंगलात प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या तारांना स्पर्श होऊन सुरेशचा मृत्यू झाला असावा. शिकाºयांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला नाल्यात पुरले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पाच इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूArrestअटक