शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

नदीपात्रात मिळाला बेपत्ता युवकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:30 PM

येथील कोत्तुर रोड, वॉर्ड नं.२ मधील रहिवासी सूरज मुतय्या भोगावार (२३) या युवकाचा मृतदेह सोमवारी प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली घाटावर आढळला. तो गेल्या गुरूवारपासून बेपत्ता होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.

ठळक मुद्देमृत्यूचे कारण गुलदस्त्यात : गुरूवारपासून होता गायब

आॅनलाईन लोकमतअहेरी : येथील कोत्तुर रोड, वॉर्ड नं.२ मधील रहिवासी सूरज मुतय्या भोगावार (२३) या युवकाचा मृतदेह सोमवारी प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली घाटावर आढळला. तो गेल्या गुरूवारपासून बेपत्ता होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.सुरज हा पंचायत समितीत संगणक परिचालक म्हणून कार्यरत होता. दि.१५ ला आपले काम आटोपून कार्यालयातून निघून गेला. मात्र घरी आलाच नाही. तो एखाद्या मित्राकडे असेल असे कुटुंबियांना वाटले. पण शनिवारी संध्याकाळी गावातील एका इसमाला त्याची सायकल प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली घाटाजवळील पुलाच्या रपट्याजवळ दिसली.तीन दिवसांपासून सुरजचा शोध लागला नसल्याने आणि मोबाईलसुद्धा बंद असल्याने. रविवारी सकाळी मोठे भाऊ शिवकुमार भोगावार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास सुरजचा मृतदेह नदीपात्रात दिसला. तो मृतदेह बाहेर काढून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या मागे आई, भाऊ, वहिनी, पुतण्या असा आप्त परिवार होता.