शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

शस्त्र चालविताना बहरले प्रेम, लग्नही केले, नऊ वर्षांनंतर पोलिसांना शरण

By संजय तिपाले | Updated: October 14, 2024 16:39 IST

दाम्पत्यावर होते दहा लाखांचे बक्षीस : आता शासनच देणार साडेअकरा लाख

गडचिरोली :  ती भामरागडची अन् तो छत्तीसगडचा. भरतारुण्यात पाऊले भरकटली अन् दोघेही हिंसक नक्षल चळवळीत सहभागी झाले. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले व प्रेमाचा प्रवास लग्नबंधनापर्यंत पोहोचला. मात्र, नक्षल चळवळीत वैवाहिक आयुष्य जगता येत नसल्याने नऊ वर्षांनंतर १४ ऑक्टोबरला त्यांनी शस्त्रे म्यान करुन आत्मसमर्पणाची वाट निवडली. दोघांवर शासनाचे दहा लाखांचे बक्षीस होते, पण आता आत्मसमर्पण केल्याबद्दल त्यांनाच शासन साडेअकरा लाख रुपये देणार आहे. अनेक हिंसक कारवायांत सक्रिय सहभाग असलेल्या या दाम्पत्याच्या शरणागतीने नक्षल्यांना मोठा हादरा बसला आहे.

 वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु (२७, रा. पिडमिली ता. चिंतागुफा, जि. सुकमा (छत्तीसगड) व त्याची पत्नी   रोशनी विज्या वाचामी(२४ , रा. मल्लमपोड्डुर, ता. भामरागड) असे या जहाल माओवादी दाम्पत्याचे नाव आहे.  वरुण हा भामरागड दलममध्ये कमांडर पदावर तर रोशनी ही याच दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. सन २०१५ मध्ये कोंटा एरीया मध्ये भरती होऊन सदस्य पदावर भरती झाला. २०२० पर्यंत तो दंडकारण्यमधील स्पेशल झोनल कमिटी सदस्य गिरीधर तुमरेटी याचा अंगरक्षक म्हणून तो कार्यरत होता. २०२० ते २०२२ मध्ये तो भामरागडमध्ये उपकमांडपदी पदोन्नतीवर गेला. २०२२ पासून तो भामरागड दलममध्ये उपकमांडर म्हणून कार्यरत होता.  त्याने कार्यकाळात १५ गुन्हे केले असून १० चकमकीसह इतर ५ गुन्ह्यांचा समावेश आहे.  रोशनी   वाचामी ही २०१५ मध्ये राही दलममध्ये भरती होऊन सदस्य पदावर कार्यरत झाली. २०१६ मध्ये तिची भामरागड दलममध्ये बदली झाली. २०१७ मध्ये ती अहेरी दलममध्ये बदली होऊन गेली. २०१९ मध्ये ती पुन्हा भामरागड दलममध्ये सक्रिय झाली. पुढे एक वर्षे ती गट्टा दलममध्ये होती. २०२२ मध्ये ती पुन्हा भामरागड दलममध्ये बदली होऊन पार्टी सदस्य पदावर कार्यरत होती. तिने २३ गुन्हे केले. त्यात १३ चकमकी व इतर १० गुन्हे केल्याची नोंद आहे. 

आतापर्यंत २७ जणांचे आत्मसमर्पण पोलिसांनी माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची संधी  दिल्याने २०२२ ते २०२४ या दरम्यान २७ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.  विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल,  , राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा , पोलिस अधीक्षक नीलोत्पल,  कमांडंट दाओ इंजिरकान किंडो,  यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पाडली 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी