शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
2
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
3
Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?
4
कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली
5
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
6
नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; AC न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक
7
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
8
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
9
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
10
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
11
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
12
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
13
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
14
IPL 2025 Winner : ...अन् 'अनसोल्ड'चा टॅग लागलेल्या रजतच्या कॅप्टन्सीत RCB नं साधली 'सुवर्ण' संधी
15
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
16
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
17
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत
18
पाकचे ४८ तासांचे नियोजन भारताने ८ तासांतच उधळले- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान
19
धारावी पुनर्विकास प्रकल्प: कुर्ला जमीन हस्तांतरणाच्या अटींत बदल; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
20
"महिला आयोग बैठकीचा अधिकार राज्यपालांना; उपसभापतींना नाही"; नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका

पालिकेच्या शिबिरात सफाई कामगारांसह १६ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:01 IST

शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी संजीव ओहोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका अल्का पोहणकर, नीता उंदीरवाडे यांच्यासह पालिकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

ठळक मुद्देनगराध्यक्षांचे प्रतिपादन । रक्तच मानवाचे प्राण वाचवू शकते

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषद गडचिरोली, एचडीएफसी बँक व लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी स्थानिक नगर पालिकेच्या कर विभागाच्या सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नगर परिषद, एचडीएफसी बँक कर्मचारी व सफाई कामगार मिळून एकूण १६ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी संजीव ओहोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका अल्का पोहणकर, नीता उंदीरवाडे यांच्यासह पालिकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे म्हणाल्या, गडचिरोली जिल्ह्यात नेहमी रक्ताची टंचाई भासत असते. जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय तसेच तालुकास्तरावरील रुग्णालयामध्ये विविध आजाराने ग्रस्त रुग्ण मोठ्या संख्येने औषधोपचारासाठी भरती होतात. आधुनिकीकरणामुळे वाहनांची संख्या वाढली असून त्याबरोबर अपघातही वाढले आहे. या अपघातात बरेच लोक जखमी होतात. अशा जखमी व विविध आजाराने ग्रस्त रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत असते. सिकलसेल रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. त्यांना रक्त पुरवठा न झाल्यास धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्ताचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन नगराध्यक्ष पिपरे यांनी यावेळी केले.याप्रसंगी मुख्याधिकारी संजीव ओहोळ व नगरसेवक प्रमोद पिपरे यांनीही आपल्या भाषणातून रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. मानवाचे जीवन अमूल्य आहे, आपले रक्त कोणत्याही नागरिकाच्या कामी येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नगर परिषद, एचडीएफसी बँक तसेच पालिकेच्या नाली सफाई रोजंदारी कामगारांनी सहकार्य केले.

टॅग्स :Socialसामाजिक