शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१२५ रक्तदात्यांचे रक्तदान

By admin | Updated: September 28, 2015 01:40 IST

संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा गडचिरोली यांच्या वतीने रविवारी जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचेही रक्तदान : संत निरंकारी मंडळाचा उपक्रमगडचिरोली : संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा गडचिरोली यांच्या वतीने रविवारी जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात १२५ पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी स्वत: रक्तदान करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ केला.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, देसाईगंजचे संवर्ग विकास अधिकारी सुनिता म्हरस्कोल्हे डॉ. नारायण करेवार, संत निरंकारी मंडळाचे ब्रँच मुखीया गजानन तुंकलवार, डॉ. साळवे, नगर सेवक राजू जेठाणी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी बहुतांश नागरिकांमध्ये रक्तदान करण्याची क्षमता आहे. मात्र यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवा केल्याचे समाधान मिळत असल्याने प्रत्येक नागरिकाने रक्तदान केले पाहिजे. सामाजिक बांधिलकी मजबूत होत गेल्यास आव्हानांचा सामाना करणे सोपे जाते. संत निरंकारी मंडळ राबवित असलेले समाज उपयोगी कार्यक्रम निश्चितच कौतुकास पात्र आहेत. या मंडळापासून इतर मंडळे, स्वयंसेवी संस्था व धार्मिक संस्थांनी धडा घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सकाळी ११ वाजता रक्तदानास सुरूवात झाली होती. रक्तदान करण्यासाठी सकाळपासूनच संत निरंकारी मंडळाचे शेकडो कार्यकर्ते रूग्णालयात दाखल झाले होते. सायंकाळपर्यंत रक्तदान सुरूच होते. विशेष म्हणजे या सामाजिक उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: रक्तदान करून रक्तदान शिबिराची सुरूवात केली. प्रास्ताविक हरिष निरंकारी, संचालन भास्कर मडावी तर आभार अशोक बोरकुटे यांनी मानले.शिबिर यशस्वीतेसाठी संत निरंकारी मंडळाचे सदस्य यांच्यासोबतच रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शैला मैदमवार, तंत्रज्ञ अनिल घोडमारे, विजय पत्तीवार, सुरेश येसेकर, सतिश तडकलवार, बिबुशचंद्र रामटेके, वाघाडे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)