आमदारांची माहिती : जिल्हाभरात टप्प्याटप्प्याने होणार वृक्षारोपणलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पर्यावरणाचे संवर्धन करण्याकरिता वृक्ष लागवडीचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने विद्यमान केंद्र व राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यात सामाजिक बांधिलकी म्हणून भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने १ ते ७ जुलैदरम्यान बाराही तालुक्यात विविध ठिकाणी तब्बल दोन लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या सदर दोन लाख वृक्ष लागवड कार्यक्रमासंदर्भात नियोजन करण्यात आले असून बाराही तालुका ठिकाणाहून रोपटे उपलब्ध होतील. वन विभागाचे रोपवाटिकेतून विविध जातींची रोपटे उपलब्ध करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते वृक्ष लागवड करणार आहेत, असेही डॉ. होळी यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, पं. स. उपसभापती विलास दशमुखे, सभापती केशव निंबोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे, संजय मेश्राम, भाजपचे पदाधिकारी रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, डॉ. भारत खटी आदी हजर होते.
भाजप दोन लाख रोपटी लावणार
By admin | Updated: June 30, 2017 01:08 IST