शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

भाजपा आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार

By admin | Updated: June 4, 2015 01:32 IST

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या शासकीय सेवेतील राजीनाम्याच्या मुद्यावरून त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.

नागपूर खंडपीठ : १० जूनला न्यायालयात उत्तर देण्याची अंतिम संधीगडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या शासकीय सेवेतील राजीनाम्याच्या मुद्यावरून त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. या संदर्भात अपक्ष उमेदवार नारायणराव दिनबाजी जांभुळे यांनी २ डिसेंबर २०१४ ला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात डॉ. देवराव होळी यांची आमदारकी रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दोनवेळा आपली बाजू मांडण्यासाठी डॉ. देवराव होळी यांना संधी देण्यात आली होती. मात्र त्यांनी न्यायालयात या संदर्भात बाजू मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. न्यायालयाने त्यांना १० जून पर्यंत उत्तर दाखल करण्यासाठी अंतिम तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत जर आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडून उत्तर दाखल झाले नाही तर न्यायालय आपला निर्णय देऊ शकते, असे ज्येष्ठ विधीज्ञांचे म्हणणे आहे.आमदार होण्यापूर्वी डॉ. देवराव होळी हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला, परंतु तो मंजूर झाला नाही. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे, ते सरकारी सेवेत असताना त्यांनी शकुंतला मेमोरीअल सोसायटी धर्मदाय या संस्थेचे अध्यक्ष पदही भुषविले व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या कार्यक्रमात घोटाळा या संस्थेने केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गडचिरोली जिल्हा न्यायालयात खटला सुरू आहे. यात ८ लाख ६७ हजार ३६३ रूपयांची रिकव्हरी निघालेली आहे. डॉ. होळी हे विधानसभेवर निवडून आल्यानंतर या मतदार संघातून निवडणूक लढलेले उमेदवार नारायण जांभुळे यांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. यादरम्यान डॉ. होळी यांनी आपला राजीनामा नामंजूर करण्याच्या प्रशासकीय आदेशा विरोधात मॅटमध्येही आव्हान दिले आहे. मॅटने २८ आॅक्टोबर २०१४ ला त्यांची याचिका खारीज करून प्रशासनाने राजीनामा नामंजूर करण्याचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यालाही फेब्रुवारी २०१५ मध्ये हायकोर्टात डॉ. होळी यांनी आव्हान दिले आहे. एकूणच न्यायालयीन प्रक्रियेत होळी यांच्या आमदारकीवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. (जिल्हा प्रतिनिधी)