शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

ओबीसींकडून भाजप सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:25 IST

ओबीसी आरक्षण व जिल्ह्यातील विविध समस्यासंदर्भातील येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ओबीसी बांधव संतप्त झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरमोरीला येत असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. दरम्यान आरमोरी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह काही ओबीसी बांधवांना रविवारी स्थानबध्द केले.

ठळक मुद्देपोलीस सतर्क : कार्यकर्त्यांची धरपकड

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : ओबीसी आरक्षण व जिल्ह्यातील विविध समस्यासंदर्भातील येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ओबीसी बांधव संतप्त झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरमोरीला येत असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. दरम्यान आरमोरी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह काही ओबीसी बांधवांना रविवारी स्थानबध्द केले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत पाच दौरे केले. दौऱ्यादरम्यान त्यांनी जनतेला अनेक आश्वासन दिले. मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात असंतोष होता. मुख्यमंत्र्यांना काळे झेडे दाखवून निषेध करणार, हे लक्षात येताच पोलिसांनी आरमोरी येथील कार्यकर्त्यांना स्थानबध्द केले. यामध्ये लारेन्स गेडाम, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम, दिवाकर पोटफोडे, नरेंद्र गजभिये, पुरूषोत्तम मैंद, निलेश अंबादे, प्रविण ठेंगरी आदीचा समावेश आहे.जिल्हाध्यक्ष स्थानबद्धमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी रविवारी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रूचित वांढरे यांच्यासह अन्य एका कार्यकर्त्याला वांढरे यांच्या घरून त्यांना ताब्यात घेऊन दिवसभर पोलीस ठाण्यात स्थानबध्द ठेवले. मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ घालू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून धरपकड मोहीम राबविली. सकाही ९.३० वाजता पोलीस वांढरे यांच्या घरी पोहोचून त्यांना वाहनात बसवून ठाण्यात आणले.