चामाेर्शी : तालुक्यातील जामगिरी ग्रामपंचायतमध्ये सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक १६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. याप्रसंगी भारतीय जनता पक्ष समर्थित गटाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविराेध निवड करण्यात आली. संरपचपदी भैयाजी वाढई, तर उपसरपंचपदी सुनीता डोर्लीकर यांची निवड करण्यात आली. भैयाजी वाढई यांची पाचव्यांदा सरपंचपदी निवड झाली आहे. जामगिरी येथील सरपंचपद नामाप्र (सर्वसाधारण)साठी राखीव हाेते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुभाष सरपे यांनी काम पाहिले. यावेळी नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य जयश्री मडावी, बेबी वाढई, रेखा मनोहर बोटरे, रेखा कोवे, रोहिणी गेडाम उपस्थित होते. पंचायत समिती सभापती भाऊराव डाेर्लीकर यांच्या नेतृत्वात सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक पार पडली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
जामगिरी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:44 IST