शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपबहुल सरपंचांचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 11:55 PM

यातील १० ग्रामपंचायतींवर भाजपबहुल सरपंचांचा वरचष्मा राहिला आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे ३ तर काँग्रेसबहुल ३ सरपंच झाल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ग्रामपंचायतीत वर्चस्व आहे. २ ठिकाणचे सरपंच कोणत्याही गटाशी निगडित नाहीत. धानोरा तालुक्यातील कामतळा येथे सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नसल्याने हे सरपंचपद रिक्त राहिले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात रविवार १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयात झाली. यातील १० ग्रामपंचायतींवर भाजपबहुल सरपंचांचा वरचष्मा राहिला आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे ३ तर काँग्रेसबहुल ३ सरपंच झाल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ग्रामपंचायतीत वर्चस्व आहे. २ ठिकाणचे सरपंच कोणत्याही गटाशी निगडित नाहीत. धानोरा तालुक्यातील कामतळा येथे सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नसल्याने हे सरपंचपद रिक्त राहिले.पाच ठिकाणी अविराेध निवड झाली. त्यात धानाेरा तालुक्यातील जप्पी, कामतळा आणि लेखा तसेच आरमाेरी तालुक्यातील नरचुली आणि एटापल्ली तालुक्यातील काेटमी येथील निवडणूक अविराेध झाली. कामतळा येथे सरपंचपद रिक्त आहे.

अनंती पदा ठरल्या जांभळीच्या पहिल्या सरपंच

    आरमोरी तालुक्यातील नरचुली ग्रामपंचायतचे विभाजन होऊन नव्याने तयार झालेल्या जांभळी ग्रामपंचायतच्या  पहिल्याच सरपंचपदी विराजमान होण्याचा बहुमान काँग्रेसप्रणित उमेदवार अनंती मनिराम पदा यांना मिळाला. या निवडणुकीत  आरमोरी पंचायत समितीच्या माजी सभापती बबिता जीवनदास उसेंडी यांना पराभव पत्करावा लागला.     आरमोरी तालुक्यातील नरचुली व जांभळी या दोन ग्रामपंचायतच्या निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये नरचुली येथील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच हे अविरोध निवडून आले. जांभळी ग्रामपंचायतचे सर्व सात सदस्य अविरोध निवडून आले. मात्र सरपंचपदासाठी एकमत झाले नाही.    जांभळी ग्रामपंचायतच्या पहिल्या सरपंचपदासाठी १६ ऑक्टोबरला निवडणूक  घेण्यात आली. त्याचा निकाल  मंगळवारी सकाळी  जाहीर झाला. यामध्ये माजी पं. स. सभापती बग्गू ताडाम यांच्या गटाला धक्का बसला.  पंचायत समितीच्या माजी सभापती बबिता उसेंडी यांचा पराभव झाला तर रामचंद्र टेकाम गटाच्या अनंती मनिराम पदा या निवडून आल्या.अनंती पदा यांना  ४६९ मते मिळाली तर बबिता उसेंडी  यांना ३६४  मते मिळाली.     नोटावर २३ उमेदवारांनी पसंती दर्शविली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. एस. मडावी, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ए. आर. मेंढे यांनी काम पाहिले. तालुक्यात निवडणूक शांततेच्या वातावरणात आणि कुठेही गडबड न हाेता पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास साेडला. 

एटापल्लीत आविसंचे वर्चस्व

-    एटापल्ली तालुक्यातील कोहका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आदिवासी विद्यार्थी संघ तथा ग्रामसभेचे वर्चस्व आले आहे. एकूण सात सदस्यीय ग्रामपंचायतीत आविसचे अंतू बारसा यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच व ५ सदस्य अशा एकूण सहा जागांकरिता ही निवडणूक झाली. -    कोटमी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. या ठिकाणीही आविसबहुल सरपंच निवडल्या गेल्याचा दावा केला जात आहे. सरपंचपदाकरीता आविसं तथा ग्रामसभेकडून वनिता संजय हिचामी आणि भाजपाचे सुनीता बंडू नरोठे उभे होते. आविसंच्या वनिता हिचामी ३६१, तर भाजपाच्या सुनीता नरोठे यांना २८७ मते मिळाली. नोटावर तब्बल ६८ मते पडली. -    सपना अंताराम पुगांटी, शिलो सनकू दुग्गा, अशोक जयराम मडावी, लता गणू पुंगाटी, नाना रावजी कडयामी, जनली दिवाकर नरोठे हे विजयी झाले. आविसंला सर्वाधिक ४ जागा मिळाल्याने एकहाती सत्ता आली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, नंदू मट्टामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्वल नागूलवार, मंगेश हलामी, मनिराम हिचामी, सुधाकर टेकाम यांच्यासह आविस व ग्रामसभेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

घोटमध्ये रूपाली दुधबावरे, तर दुर्गापूरमध्ये सोनी मंडल सरपंच

-    चामोर्शी तालुक्यातील घाेट व दुर्गापूर या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली. दोनही ठिकाणी भाजपबहुल उमेदवार विजयी झाल्या आहेत. थेट मतदारांकडून सरपंचाची निवड असल्याने याबाबत उत्सुकता होती.  -    घोटच्या सरपंचपदी अनुसूचित जाती प्रवर्गातून व थेट जनतेतून रूपाली प्रशांत दुधबावरे निवडून आल्या. त्या ३३२१ पैकी १४४७ मतांनी विजयी झाल्या. याशिवाय दुर्गापूरच्या सरपंचपदी नामाप्र (स्त्री) राखीव गटातून सोनी दिनेश मंडल यांनी २१७२ मतांपैकी १०९८ मते घेऊन सरपंचपदासाठी बाजी मारली.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक