महामानवाला हजारोंची आदरांजली : जिल्हाभरात अनेक कार्यक्रमांतून मार्गदर्शन; भीम रॅलींनी गाव व शहर दुमदुमलेगडचिरोली : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरूवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, समाज मंडळांच्या वतीने व्याख्यान, विविध स्पर्धा व उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित बाबासाहेबांच्या जयंती कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) मंजुनाथ सिंगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील बाबर, पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार व पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली. नेहरू युवा केंद्र, गडचिरोली : कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून नीतेश दाकोटे, प्रमुख अतिथी म्हणून दिवाकर सहारे, प्रमोद भोयर, विभा चौधरी, कल्याणी बोरकर, जयश्री बोरकर, अश्विनी बोरकर उपस्थित होत्या. बाबासाहेबांचे विचार युवकांनी अंगिकारावे, असे आवाहन दाकोटे यांनी केले. संचालन माधुरी जेंगठे तर आभार शुभम साठवणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रोशन चापले, अक्षय पेद्दीवार, शीतल डोईजड यांनी सहकार्य केले. मुलचेरा : येथील बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात पंचशील बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष प्रफुल दुर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला नायब तहसीलदार पठाण, कनिष्ठ अभियंता डोंगरे, वाणी, उमेश पेदुकर, उमाजी डोर्लीकर उपस्थित होते. सायंकाळी भीम रॅली काढण्यात आली. दरम्यान नवीन बौद्ध विहार बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. ग्राम पंचायत येल्ला : येथे सरपंच गजानन आलाम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला सुभाष रामटेके, आनंद रामटेके, मंगा पातेवार, कैलास मडावी व विद्यार्थी उपस्थित होते. ग्राम पंचायत, लगाम : बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सरपंच मनीष मारटकर यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक यशवंतकुमार गोंगले, उपसरपंच देवाजी सिडाम, वि. ग. गेडाम, माजी सैनिक बाबुराव मडावी, हरिदास गेडाम, मिराजी मडावी, नंदेश मडावी व ग्रामस्थ उपस्थित होते. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालय, धानोरा : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुशालचंद गेडाम होते. यावेळी प्रा. अंबादे, प्रा. घनश्याम राऊत उपस्थित होते. बाबासाहेबांनी स्वातंत्र, समता, बंधुता व न्याय या मूल्यांच्या आधारे जीवन जगण्याची दिशा दाखविली, असे प्रतिपादन प्रा. अंबादे यांनी केले. कार्यक्रमात इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. संचालन सत्यवान गुरनुले तर आभार प्रमोद सहारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी नरेश भैसारे, प्रवीण येलसलवार, कवडू ठाकरे, रामदास नंदेश्वर, यश गेडाम, मुकाजी भेंडारे, मुखरू गावतुरे, केशव ठाकरे, अमोल चन्नेवार, नरेश हारामी, मयूर मोहुर्ले, प्रशांत निकेसर, भाष्कर सोनुले यांनी सहकार्य केले. बाबासाहेब उत्सव समिती, गडचिरोली : जयंती कार्यक्रमाला अतुल मल्लेलवार, दीपक मडके, सचिन बोबाटे, अभिजीत कोरडे, तन्मय देशपांडे, शीव वडेट्टीवार, सिद्धार्थ टेंभुर्णे, कृणाल पांडे, सौरभ भडांगे, सारंग चन्नावार, अॅड. मेश्राम, सर्वेश पोपट, जितेंद्र मुनघाटे, मनीष डोंगरे, देवाशिष भांडेकर, मनोज वनकर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामसेवक युनियन, गडचिरोली : ग्रामसेवक भवनात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वन परिक्षेत्राधिकारी शालिकराम विधाते होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, विस्तार अधिकारी विनायक देवारे, देवानंद गायकवाड, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, खुशाल नेवारे, श्रीकृष्ण मंगर, जयंत मेश्राम, रमेश सहारे, संजीव बोरकर, भरत बन्सोड, चांगदेव कन्नाके, खुशाल नंदेश्वर, राजेंद्र शेंडे, कुरूडे, किशोर कुलसंगे उपस्थित होेते. यावेळी सामाजिक समता राखण्याची शपथ उपस्थितांना देण्यात आली. राष्ट्रहित जनकल्याण संघटना, आरमोरी : कार्यक्रमाला गोवर्धन काळे, परसराम गोंदोळे, करण मिश्र, राजू गारोदे, प्रा. गंगाधर जुआरे, सुरेश कांबळे, विनायक गोंदोळे, मनोहर डाखरे, गुणवंत गोंदोळे, संजय गोंदोळे, धनराज दुमाने, भाष्कर दहीकर, अशोक तोंडरे, मारोती ढोरे, मनोहर शेख, नानाजी दुमाने, अविनाश टिचकुले, सादीक खान, बालाजी दुमाने, पीयूष गोंदोळे उपस्थित होते. आभार संजय गोंदोळे यांनी मानले. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पोटेगाव : बाबासाहेब यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गणेशराम खांडवाये होते. प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, नलिनी कुमरे, एस. आर. जाधव, के. जी. गेडाम, कल्पना चौधरी, व्ही. एस. देसू, पी. जी. भुरसे, एम. जी. वासेकर, जी. टी. सिडाम उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. दरम्यान संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. राणी दुर्गावती कन्या विद्यालय, गडचिरोली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सिंधू चहांदे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महाविरणचे अधीक्षक अभियंता एस. आर. कांबळे, जयकुमार मेश्राम, संध्या येलेकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. दरम्यान निबंध, वक्तृत्त्व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. संचालन ज्योती दुपारे तर आभार पुरूषोत्तम ठाकरे यांनी मानले. विलास निंबोरकर, वैशाली मडावी, सोनाली लट्टे, पौर्णिमा शेंडे, अजय भशाखेत्रे, कुणाल बागडे यांनी सहकार्य केले. महिला काँग्रेस कमिटी, गडचिरोली : कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, नगरसेविका पुष्पा कुमरे, उपाध्यक्ष प्रतिभा जुमनाके, तालुकाध्यक्ष ज्योती गव्हाने, पुष्पा ब्राम्हणवाडे, गीता पित्तुलवार, माधुरी कुसराम, तालुका उपाध्यक्ष वर्षा गुलदेवकर, शुभांगी मोटघरे, आरमोरी तालुका उपाध्यक्ष अर्चना जनगनवार, गीता वाळके व महिला उपस्थित होत्या. ग्राम पंचायत, कोठारी : जयंती कार्यक्रमाला सरपंच माणिकराव शेडमाके, विनोद रायपुरे, विश्वनाथ उरेते, सुरेश सिडाम, प्रकाश खापनवाडे, चाँद शेख, बंडू कडते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. वन परिक्षेत्र कार्यालय, मालेवाडा : कार्यक्रमाला वन परिक्षेत्राधिकारी डी. आर. कोरेवार, एम. एफ. पठाण, व्ही. एम. तुमराम, टी. एन. कुमरे, के. जे. उमरे, आर. पी. लकडे, व्ही. आर. कुमोटी, डी. डी. वड्डे, व्ही. जी. रंदये, मांढरे, प्रकाश कुमरे, मनोज देशमुख उपस्थित होते. कोरेवार यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. अहेरी : तालुक्यातील नंदीगाव येथे गणपत दहेगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी रत्नागिरी होते. यावेळी संदीप दुर्गे, प्रकाश मेश्राम, किशोर चालुरकर, नंदू दुर्गे, लालू चालुरकर, किशोर दुर्गे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर भोजनदान करण्यात आले. जि. प. प्राथमिक शाळा आरमोरी (बर्डी) : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पं. स. उपसभापती चंदू वडपल्लीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य लक्ष्मी मने, शाळा समिती उपाध्यक्ष सुषमा गेडाम, लक्ष्मी म्हशाखेत्री, संगीता दुमाने, संजय शेंडे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका ज्योती काटरपवार, संचालन नयना कोरगंटीवार तर आभार डी. के. खेवले यांनी मानले. यशस्वीतेसाठी धनश्री मिसार व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. प्रियंका हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, कनेरी : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. एस. गडपल्लीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून डी. के. कांबळे, संगीता निनावे, नंदनवार उपस्थित होते. या कार्यक्रमात कांबळे यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. संचालन शरद गायकवाड तर आभार ए. टी. गंडाटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. साईबाबा विद्यालय, गिलगाव (बा.) : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के. एच. झाडे होते. यावेळी प्रा. धकाते, प्रा. वडमलवार, प्रा. खोब्रागडे, प्रा. चंदेल, गडपायले, देशमुख, नगराळे, बुरबांधे, वर्धलवार, पटले, हुलके, कुथे, फुलवार, वाढणकर, गजभिये उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गं्रथांचे वाचन केले. जि. प. प्राथमिक शाळा, कोकडकसा : बाबासाहेबांच्या जयंती कार्यक्रमाला रामा पदा, बुद्दू हिचामी, गांडो पदा उपस्थित होते. या कार्यक्रमात चित्रकला, रांगोळी व भाषण स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. संचालन सी. एन. उंदीरवाडे यांनी केले. जि. प. प्राथमिक शाळा गोमणीटोला, कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष आत्माराम गोंदलवार, निर्मला उंदीरवाडे उपस्थित होते. यावेळी भाषण, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन पी. पी. वालदे यांनी केले. जि. प. उच्च प्राथमिक शाळा, नवेगाव रै. : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष साईनाथ दुधबळे होते. प्रमुख अतिथी म्हणून गुरूदास गेडाम, जागेश्वर भांडेकर, वर्षा सातपुते, सुनीता तुरे, मंगला पिपरे, मुख्याध्यापक बोधलकर, वंदना ठवरे, सुचिता दुधबावरे, भाष्कर कुंभारे, अरूण दुधबावरे, हेमलता उईके, दिनकर भांडेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन घेण्यात आले. यात २२१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. संचालन महेंद्र भैसारे तर आभार सावरबांधे यांनी मानले. कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल, चातगाव : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य टी. के. बोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून डब्ल्यू. एस. तडसे, एन. डी. पुसदेकर उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले. संचालन एन. डी. नवघडे तर आभार व्ही. आर. नरड यांनी मानले. जि. प. प्राथमिक शाळा, बोदली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आकाश निकोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून सुधा चौधरी, देवेंद्र पिपरे, शोभा निकोडे, भडांगे, भारती, घाटबांधे, रामटेके उपस्थित होत्या. यावेळी बबली वाढई, अनुष्का जांभुळकर, क्रिश जांभुळकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पोरेड्डीवार, संचालन युवराज पिपरे तर आभार कोडाप यांनी मानले. प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट, गडचिरोली : जयंती कार्यक्रमानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला प्राचार्य सविता गोविंदवार यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी चेतन गोरे, रिझवाना पठाण व शिक्षक उपस्थित होते. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. जनकल्याण वृद्धाश्रम, कोटगल : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेमदेव हस्ते होेते. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष विमल मेश्राम, सचिव अनुप मेश्राम, नरेंद्र रायपुरे, दुर्याेधन रायपुरे, नवल मेश्राम, जगन्नाथ मेश्राम, मुख्याध्यापक जे. पी. उंदीरवाडे, प्रतिभा बन्सोड उपस्थित होते. नवयुग विद्यालय, गुरवळा : कार्यक्रमाला मुख्याध्यापक एम. एस. कवठे, रायपुरे, कुनघाडकर, खोब्रागडे, मगरे, कनकावार, पाली, गंदेवार उपस्थित होते. कवठे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. संचालन रायपुरे तर आभार खोब्रागडे यांनी मानले. ग्राम पंचायत, पेंढरी : बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सरपंच सुदर्शना आतला, उपसरपंच पवन येरमे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी पं. स. सदस्य नामदेव शेडमाके होते. यावेळी योगेंद्र आतला, अनिल उसेंडी, मंजुषा पवार, जयंत मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मेश्राम तर आभार पंकज शेडमाके यांनी मानले. मार्र्कंडादेव : येथील मार्र्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेत आयोजित जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुशाबराव चांदेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार एच. के. डबारे, शंकर साखरे, नामदेव उंदीरवाडे, चंद्रबाबू साखरे, पंकज निखारे, लीलाधर मरस्कोल्हे, गणेश बंडावार, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, देवानंद सुरपाम, वर्षा भाजीपाले, रत्ना सुरपाम उपस्थित होत्या. संचालन पी. जी. दुबे तर आभार संस्थेचे अध्यक्ष संतोष सुरपाम यांनी मानले. महावितरण विभागीय कार्यालय, आलापल्ली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आलापल्ली महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम चव्हाण, मार्गदर्शक अॅड. उदयप्रकाश गलबले उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान निबंध स्पर्धा घेऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अॅड. उदयप्रकाश गलबले यांनी ‘राष्ट्राच्या पुनर्बांधणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी महावितरण कार्यालय आलापल्ली तसेच मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, गुरूकुल आंतरराष्ट्रीय जर्नल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल व्हिजन’ या आंतरराष्ट्रीय आॅनलाईन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. संचालन सतीश रामटेके, प्रास्ताविक मोहन गीते तर आभार संदीप सातकर यांनी मानले. अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ, गडचिरोली : गुरूदेव सेवा मंडळ व अंनिसच्या वतीने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य भाऊराव धकाते, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शिवनाथ कुंभारे, पंडित पुडके, पुरूषोत्तम चौधरी, विलास निंबोरकर, शबीर शेख उपस्थित होते. संचालन पुरूषोत्तम ठाकरे यांनी केले. गजानन राऊत, विठ्ठल कोठारे, नीलकंठ मडावी, बाळासाहेब बाळेकरमकर, बारापात्रे यांनी सहकार्य केले. कृषक हायस्कूल, चामोर्शी : बाबासाहेबांच्या जयंतीला शिक्षक मोरेश्वर गडकर, संजय कुनघाडकर, गिरीश मुंजमकर, प्रकाश मठ्ठे, लोमेश बुरांडे, अरूण दुधबावरे, दिलीप लटारे, जासुंदा जनबंधू उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रियदर्शनी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य लोखंडे होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक रामटेके, संचालन वनकर तर आभार सिद्धांत इंदूरकर यांनी मानले. कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय, चामोर्शी : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भुपेश चिकटे, डॉ. राजेंद्र झाडे, प्रा. संजय म्हस्के, प्रा. बावणे, डॉ. भूषण आंबेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीतेसाठी राजीव म्हस्के, पत्रे, बाळकृष्ण धोटे, रवींद्र कऱ्हाडे, धोडरे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. जि. प. प्राथमिक शाळा, मुधोली रिठ : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष विजय फुलझेले होते. यावेळी बाबुराव तावाडे, नेताजी देवतळे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान एकल, सामूहिक नृत्य व एकल नकल सादर करण्यात आले. कार्यक्रमात मुख्याध्यापक मेश्राम, दुर्गे यांनी मार्गदर्शन केले. संचालन अंकुर गोंगले, प्रास्ताविक सुमीत फुलझेले तर आभार सम्यक ताकसांडे यांनी मानले. शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली : कार्यक्रमाला प्राचार्य वंदना गावडे, प्रा. दुर्गम, प्रा. राकेश इंकणे, प्रा. सुबोध साखरे, सी. एन. शेटे, हावलादार, रोहणकर, कांबळे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. संचालन सनोबकौसर सय्यद तर आभार यशश्री वालदे यांनी मानले. शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य यशवंत मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य ताराम, पर्यवेक्षक मामीडवार, किरमे, कोसरे उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्य मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. तमन्ना खान, दीप्ती देव्हारे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन गेडाम तर आभार ताजणे यांनी मानले. इंदिरा गांधी विद्यालय, येनापूर : कार्यक्रमाला प्राचार्य जयंत येलमुले, डॉ. चौथाले, व्ही. एम. गोंगले, पत्रू गोंगले, वासुदेव देठेकर, धारणे उपस्थित होते. प्रास्ताविक डी. एच. टेप्पलवार, संचालन के. आर. कन्नाके तर आभार पर्यवेक्षक अशोक वाकुडकर यांनी मानले. तहसील कार्यालय, चामोर्शी : तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नायब तहसीलदार एस. के. चडगुलवार यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी पुरवठा अधिकारी रोशन कापसे, प्रशांत इंगोले, एस. आर. कावळे, शिल्पा दरेकर, ज्ञानेश्वर ठाकरे, विजय करपते, ए. के. सय्यद उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था, देसाईगंज : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख पुरूषोत्तम चापले होते. उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम. डी. लांडगे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून धमेंद्र तागडे, धनपाल मिसार, ब्रम्हानंद उईके, रामजी धोटे, गुरनुले, क्रिष्णा उईके, अरविंद टेंभुरकर, रामदास मसराम, दिलीप नाकाडे, प्रेमचंद मेश्राम, विजय परशुराम, कुंदा उके, एकनाथ किरमे, निकोडे, नंदेश्वर, शेंडे, मोहुर्ले उपस्थित होते. जि. प. प्राथमिक शाळा, शंकरपूर : जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच साधना बुल्ले होत्या. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक कैलास बहाटे उपस्थित होते. दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सुश्रिता बुल्ले हिने पटकाविला. यशस्वीतेसाठी अलोणे, दरवडे व शिक्षकांनी सहकार्य केले. गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय भांडारकर होते. प्रमुख अतिथी म्हणून राकेश चडगुलवार, संदीप कोटांगले, शंकर दासरवार, रवींद्र कोरे, सलाम, पठाण, ओमप्रकाश संग्रामे, सचिन धकाते, भुपेंद्र चौधरी, रेवनाथ लांजेवार, रहिम पटेल, शाहीद शेख, योगेश आसमवार, गजानन अनमुलवार, संतोष बोबाटे, प्रेमसुधा मडावी, किशोरलाल साठवणे, गणेश बावनकुळे, सुरेश रेचनकर, संतोष कुळमेथे उपस्थित होते. कार्यक्रमात हार्दिक वासेकर, रोहित संग्रामे, पुनेश्वर देवतळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रज्वल भानारकर याने गीतगायन केले. यावेळी पुस्तक वाचन करण्यात आले. शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, मसेली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुमने, मार्गदर्शक प्रदीप चापले, प्रमुख अतिथी म्हणून आशिष नंदनवार, मेश्राम, दाऊदसरिया, डोंगरवार, सयाम, सिद्धार्थ राऊत उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आभार बुरले यांनी मानले. यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल, आरमोरी : कार्यक्रमाला प्राचार्य अमरदिप मेश्राम, प्रा. राज अय्यर, प्रसेनजीत कोल्हे, नगमा शेख, रोशनी कुंभारे, चित्ररेखा मोहनकर, हंसराज सहारे, भोलेनाथ मेश्राम, शारदा धकाते उपस्थित होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, आरमोरी : जयंतीनिमित्त मुख्याध्यापक पी. के. सहारे व डॉ. प्रदीप खोब्रागडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला चिंतामण लाडे, रोशन खोब्रागडे, भूषण गेडाम, प्रितम सोमकुंवर, राजू मानवटकर, मनीष खोब्रागडे, दिगू खोब्रागडे, राकेश मेश्राम, प्रवीण रणदिवे, विवेक रामटेके उपस्थित होते. घोट : माडेमुधोली येथे प्रबुद्ध बौद्ध समितीच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के होते. उद्घाटन हळदवाहीचे सरपंच किशोर फुलझेले यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच रोहिदास नरोटे, उद्धव ठेमस्कर, वनरक्षक अंबादे, मेश्राम, रजनीकांत डोंगरे, मारोतराव मडावी, डॉ. विवेक माझी, रतन सरकार, श्रीपथ मडावी, त्रिशूल डोंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अमोल कुसराम तर आभार पीतांबर डोंगरे यांनी मानले.
बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभर साजरी
By admin | Updated: April 16, 2016 00:54 IST