शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्चूनही कचऱ्याचे ढिगारे कायमच

By admin | Updated: November 20, 2014 22:51 IST

शहर साफसुतरे ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचे वर्षाकाठी जवळपास १ कोटी ४० लाख रूपये खर्चुनही शहरात जिकडेतिकडे कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळतात. त्याचबरोबर बहुतांश

गडचिरोली : शहर साफसुतरे ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचे वर्षाकाठी जवळपास १ कोटी ४० लाख रूपये खर्चुनही शहरात जिकडेतिकडे कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळतात. त्याचबरोबर बहुतांश वार्डांमधील नाल्याही गाळाने तुंबलेल्या आहेत. कचरा उचलणे व झाडू मारण्यासाठी २० नियमित कर्मचारी असले तरी ठिकठिकाणी कचरा पडला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे दीड कोटी रूपये कचऱ्यातच जात आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शहराचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालला असून लोकवस्ती निर्माण झाल्यानंतर नगर परिषदेच्यावतीने त्या-त्या भागात नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे नाल्यांची संख्या दरवर्षी वाढतच असून नाली उपसण्याचा खर्चही वाढतच चालला आहे. यावर्षी नगर परिषदेने नाली उपसण्याचे कंत्राटतच दिले असून कंत्राटदाराला महिन्याचे ५ लाख ९६६ रूपये बिल दिल्या जाते. यावर वर्षाचे ६० लाख ११ हजार ५९२ रूपये खर्च होतात. मात्र बहुतांश वार्डांमधील नाल्या सहा महिन्यांपासून उपसल्या नसल्याने सदर नाल्या गाळाने तुंबल्या असल्याचे दिसून येते. प्रत्येक वार्डात जाऊन घराघरातील कचरा गोळा करण्यासाठी यापूर्वी नगर परिषदेने स्वत:चे मजूर नेमून दिले होते. यावर्षी मात्र घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे कंत्राटही नगर परिषदेने दिले आहे. या सदर कंत्राटदाराला महिन्याचे ३ लाख ८७ हजार ५०० रूपये दिले जातात. वर्षाचे ४४ लाख १० हजार रूपये चुकते केले जातात. शहरातील मुख्यरस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांची झाडझुड करण्यासाठी नगर परिषरदेकडे सुमारे २० कर्मचारी नियमित आहेत. या प्रत्येक कर्मचाऱ्याला १५ हजार रूपयांपेक्षा जास्त वेतन दिले जाते. त्यांच्या वेतनावर सरासरी महिन्याचे ३ लाख व वर्षाचे ३६ लाख रूपये खर्च होतात. असे एकूण शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेचे जवळपास १ कोटी ४० लाख रूपये खर्च होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होऊनही शहरात मात्र प्रत्येक वार्डात कचऱ्याचे ढिगारे बघावयास मिळतात. शहरात ठेवण्यात आलेल्या कंटेनर संपूर्ण भरून त्यातील कचरा खाली पडलेला दिसून येतो. त्यावर डुकरे दिवसभर लोळत असल्याने त्रस्त झालेले नागरिक नाईलाजास्तव कंटेनरलाच आग लावतात. एवढा खर्च होऊनही शहरात अस्वच्छता असल्याने नगर परिषदेविषयी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. (नगर प्रतिनिधी)