शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वीज नसतानाही पाठविले बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:06 IST

अहेरी तालुक्यातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे व आरेंदा ग्रा.पं.तील दोन गावात वीज खांब लावून तारा ओढण्यात आल्या. परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरू झाला नाही. मात्र नागरिकांना वीज बिल पाठविले जात आहे.

ठळक मुद्देयेरमनार परिसरातील पाच गावे : आलापल्ली वीज कार्यालयावर ग्राहकांची धडक

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे व आरेंदा ग्रा.पं.तील दोन गावात वीज खांब लावून तारा ओढण्यात आल्या. परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरू झाला नाही. मात्र नागरिकांना वीज बिल पाठविले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरूवारी आलापल्ली येथील वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले.अहेरी तालुकातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोरेपल्ली, कवटाराम व मिचगुंडा आणि आरेंदा ग्रामपंचायतमधील ताडगुडा व चौडमपल्ली आदी पाच गावांत वीज पुरवठा अद्यापही सुरू करण्यात आला नाही. विशेष म्हणजे पाचही गावांमध्ये यंदाच्या मे महिन्यात विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. परंतु तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही एक दिवस सुद्धा वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. वीज पुरवठा नसतानाही ग्राहकांना वीज देयके पाठविले जात आहेत. महावितरण कंपनीकडून नागरिकांची दिशाभूल व आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रात्रीच्या सुमारास अंधारात रस्त्याने फिरणाºया नागरिकांना सरपटणाºया प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. निवेदन देताना येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, आरेंदाचे उपसरपंच राजू तलांडी तसेच कोरेपल्ली, कवटाराम, मिचगुंडा, ताडगुडा व चौडमपल्लीतील नागरिक हजर होते.ट्रान्सफॉर्मर पडला बंदयेरमनार व आरेंदा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया गावांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी ट्रान्सफार्मर लावून तो सुरू करण्यात आला. परंतु वीज पुरवठा गावांमध्ये सुरळीत करण्यात आला नाही. वीज पुरवठा सुरू करण्याआधीच ट्रान्सफार्मर बंद पडले. ताडगुडा येथील अनेक नागरिकांच्या घरी वीज मीटरही बसविण्यात आले नाही. परंतु वीज पोहोचली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विजेची अद्यापही प्रतीक्षा आहे. महावितरण कंपनीच्या एकूणच कारभारावर परिसरातील नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :electricityवीज