शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरील मोठा खड्डा धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:56 IST

येथून जवळच वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या वैरागड-मानापूर मार्गावर मागील वर्षी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पुलावर मोठा खड्डा पडला. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता बळावली : वैरागड भागातील अनेक पूल व रस्त्यांची दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : येथून जवळच वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या वैरागड-मानापूर मार्गावर मागील वर्षी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पुलावर मोठा खड्डा पडला. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.वैरागड परिसरातील अनेक रस्ते व पुलांची दुरवस्था झाली आहे. संबंधित यंत्रणेच्या वतीने योग्य नियोजन व कामात दर्जा ठेवला जात नसल्याने वाहतुकीची समस्या ऐरणीवर आली आहे. सन २०१६ मध्ये वैलोचना नदीवर पुलाचे काम सुरू झाले. दोन वर्षात मोठ्या पुलाचे काम पूर्ण होऊन सन २०१८ पासून या पुलावरून वाहतूक सुरू झाली. मात्र गतवर्षीच्या पावसाळ्यात या पुलावर मोठा खड्डा पडला. संबंधित कंत्राटदाराकडून हा खड्डा बुजविण्यात आला. मात्र यावर्षी सुद्धा त्याच खड्ड्यासमोर दुसरा खड्डा निर्माण झाला. त्यामुळे भरधाव येणाºया वाहनाला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरमोरी-वैरागड-अंगारा-मालेवाडा व परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा रस्ता असल्याने या मार्गावर नेहमी वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे वैलोचना नदीच्या पुलावर पडलेला खड्डा योग्य पद्धतीने बुजविण्यात यावा, तसेच इतर पुलांचीही दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.आरमोरी तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्थाआरमोरी तालुक्याचा विस्तार वाढला असून अनेक गावात रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय वैरागड, मानापूर, देलनवाडी या भागातही दुरावस्था झालेल्या पुलामुळे पावसाळ्यात अनेक मार्गावरची वाहतूक विस्कळीत होत असते. मात्र या समस्येकडे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस