शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

मोठी बातमी: दोन जहाल माओवाद्यांनी ठेवले शस्त्र; आठ लाखांचे होते बक्षीस!

By संजय तिपाले | Updated: December 20, 2024 19:13 IST

आत्मसमर्पण: ५५ वर्षीय नरसिंगवर डझनभर गुन्हे, पाच खुनांचाही आरोप

संजय तिपाले /गडचिरोली : जवानांवर बेछुट गोळीबार करणे, निरपराध लाेकांचे खून करुन दहशत निर्माण करणे, असे आरोप असलेल्या ५५ वर्षीय तसेच पाच वर्षांपासून गुन्हे चळवळीसाठी काम करणाऱ्या २५ वर्षीय जहाल माओवाद्याने २० डिसेंबरला जिल्हा पोलिस दलापुढे शरणगती पत्कारली. दोघांवर मिळून एकूण आठ लाखांचे बक्षीस होते.

एरिया कमिटी मेंबर रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग ( ५५, रा. गट्टानेली, ता. धानोरा) व दलम सदस्य रमेश शामू कुंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित (२५ , रा. वेडमेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) अशी आत्मसमर्पित माओवाद्यांची नावे आहेत. नरसिंग याच्यावर सहा लाख रूपयांचे तर रमेश कुंजामवर दोन लाखांचे बक्षीस होते. आत्मसमर्पण योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून आता या दोघांना प्रत्येकी साडेचार लाख रुपये प्रोत्साहन निधी मिळणार आहे. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा , पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ ३७ बटालीयनचे प्रभारी समादेशक सुजीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण झाले. अशी आहे गुन्हे कारकीर्दरामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग हा १९९२ पासून माओवादी चळवळीत आहे. १९९२ मध्ये तो टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला.१९९५ मध्ये काकुर दलममध्ये राहुन सन १९९६ पर्यंत माओवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम तो करीत होता. पुन्हा तो टिपागड दलमसाठी काम करु लागला. पुढे माड एरिया (छत्तीसगड) येथे बदली होऊन २००१ पर्यंत त्याने पुरवठा टीममध्ये काम केले. २०१० पासून तो कुतुल आणि नेलनार दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होता. त्याच्यावर १२ गुन्हे नोंद असून ६ चकमक, ५ खून, १ दरोडा प्रकरणात त्याचा सहभाग राहिलेला आहे. रमेश शामू कुंजाम हा २०१९ पासून माओवादी चळवळीत आहे. चेतना नाट¬ मंच ,कुतुल दलममध्ये सदस्य म्हणून तो काम करत होता. त्याच्या गुन्हेकृत्याची पडताळणी सुरु आहे. चालू वर्षात २० माओवाद्यांचे आत्मसमर्पण चालू वर्षात आतापर्यंत २० माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. २०२२ पासून आतापर्यंत आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांची संख्या ३३ झाली आहे.  माओवाद्यांनी गुन्हे चळवळ सोडून आत्मसमर्पण करुन लोकशाही मार्ग स्वीकारावा , असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी