शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

कापूस बियाणे विक्रीत मोठा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

गेल्या आठवड्यात येथे पकडलेल्या २५ लाखांच्या एचटी बीटी या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची तस्करी कृषी विभागाच्या पथकाने पकडली. पण हे प्रकरण पोलिसांच्या हवाली करताच थंड पडले. उलट आरोपीचीच बाजू सावरण्याची भूमिका तपास अधिकाºयाने घेऊन या काळाबाजाराच्या मुळाशी जाण्याऐवजी त्याला अप्रत्यक्षपणे पाठबळ दिल्याची खमंग चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.

ठळक मुद्देअहेरी तालुक्यात वाढला पेरा : तेलंगणातील कंपन्यांची नजर, शेतकऱ्यांचा बिटीकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : दक्षिण गडचिरोली भागाचे केंद्रस्थान असलेल्या अहेरी तालुक्यात कापसाचा पेरा वाढण्यासोबतच बियाण्यांच्या काळाबाजारालाही ऊत आला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही कंपन्या विक्रेत्यांशी संधान साधून हा विनापरवाना बियाण्यांची विक्री करत आहे. मात्र हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू असल्याने आणि सुगावा लागूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्यामुळे या काळाबाजारात अनेक यंत्रणा सहभागी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.गेल्या आठवड्यात येथे पकडलेल्या २५ लाखांच्या एचटी बीटी या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची तस्करी कृषी विभागाच्या पथकाने पकडली. पण हे प्रकरण पोलिसांच्या हवाली करताच थंड पडले. उलट आरोपीचीच बाजू सावरण्याची भूमिका तपास अधिकाºयाने घेऊन या काळाबाजाराच्या मुळाशी जाण्याऐवजी त्याला अप्रत्यक्षपणे पाठबळ दिल्याची खमंग चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. वास्तविक कृषी विभागाच्या कारवाईनंतर आता काही व्यापारीही पोलिसांच्या गळाला लागतील अशा जोरदार चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती. पण पोलिसांच्या नरमाईच्या भूमिकेमुळे काळाबाजारात सहभागी असणारे व्यापारी जणूकाही पुढेही हे व्यवहार करण्याची मूक संमतीच मिळाल्याप्रमाणे वावरत असल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.देशात प्रकारच्या बीटी कापसाच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी आहे. ज्या व्यक्तीकडे हे बियाणे आढळेल, त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रु पयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तरीसुद्धा तालुक्यात मोठ्या प्रमाणात या बियाण्यांचा वापर सुरू आहे. सरकारमान्य कंपन्यांद्वारे हे बियाणे विकले जात नाही. पण काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या नेटवर्कमधून हे बियाणे आंध्र प्रदेशातून विक्रीसाठी आणली जात आहे. मागील दोन वर्षांपासून कापूस पेरणीतील जवळपास ८० ते ९० टक्के पेरणी याच बिटी बियाण्यांद्वारे करण्यात येत आहे.४ जूनच्या रात्री मिळालेले बियाणे तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. वास्तविक तणनाशकांच्या वापरास बंदी असल्याने ग्लायफोसेटयुक्त बीटी बियाणे राज्य सरकारद्वारे विकले जात नाही. या बियाण्यांमध्ये तणनाशक तत्वे असतात. त्यामुळे कापसाच्या रोपट्याभोवती तणनिर्मिती होत नाही आणि पिकांची वाढ चांगली होते. परंतु याच ग्लायफोसेटमुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे सिद्ध झाल्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये या तंत्रज्ञानावर तसेच या बियाण्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बीटीमध्ये तणनाशकाचा वापर केला गेला आहे. त्यामुळे या बियाण्यांची शेतकऱ्यांकडून मागणी जास्त आहे. त्याचाच फायदा घेत बियाण्यांचा काळाबाजार जोरात सुरू आहे. कृषी विभागाकडून या बियाण्यांच्या विक्रीवर नजर ठेवली जात असली तरी अहेरी पोलीसांकडून होणाऱ्या तपासावर शंकेचे सावट आल्याने कृषी विभागाची मेहनत कुचकामी ठरत असल्याची भावना एका अधिकाºयाने व्यक्त केली.बियाण्यांची विक्री नाही, तरीही झाली लागवडअहेरी तालुक्यात मागील वर्षी १८८६.९० हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली होती. त्यात अहेरी मंडळामध्ये १२४० हेक्टर, आलापल्ली मंडळात २६०.६० हेक्टर, पेरमिली मंडळात ५४ हेक्टर तर जिमलगट्टा मंडळात ३१४.३० हेक्टर कापूस पेरणी करण्यात आली. परंतु कृषी केंद्रांचे रेकॉर्ड पाहिल्यास अगदी कमी प्रमाणात कापूस बियाणे विकल्या गेली. यावरून जो काही कापसाचा पेरा झाला तो अवैधपणे काळाबाजारातून घेतलेल्या बियाण्यांमधून झाल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती