शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘भीम सेतू’ला चुकांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 23:52 IST

कित्येक वर्षांपासून एका पुलाअभावी पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १५ ते २० गावांना बारमाही संपर्काचे स्वप्न दाखविणाऱ्या येरमणार नाल्यावरील ‘भीम सेतू’ या पुलाला तांत्रिक चुकांचे ग्रहण लागले.

ठळक मुद्देकच्चे बांधकाम : पुरात वाहून गेला दोन्ही बाजूंचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कित्येक वर्षांपासून एका पुलाअभावी पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १५ ते २० गावांना बारमाही संपर्काचे स्वप्न दाखविणाऱ्या येरमणार नाल्यावरील ‘भीम सेतू’ या पुलाला तांत्रिक चुकांचे ग्रहण लागले. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच पुलाच्या दोन्ही बाजूकडील माती वाहून गेल्याने पुन्हा नागरिकांना नाला पार करताना कसरत करावी लागत आहे.अहेरी तालुक्यातील पेरमिली-येरमणार लगतच्या परिसरात असलेला येरमणार नाला उन्हाळ्यात कोरडा पडतो. त्यामुळे नाल्यातून पलिकडे जाणे सर्वांना सहज शक्य होते. मात्र पावसाळ्याला सुरूवात होताच हा नाला पुन्हा प्रवाहित होतो आणि मग पुढचे ५ ते ६ महिने नागरिकांना वाहत्या पाण्यातूनच पैलतिर गाठावे लागते. या नाल्यावर पूल बांधण्याचा प्रयत्न केला तरी नक्षलदृष्ट्या अतिसंवेदन भागामुळे कंत्राटदार हे काम घेण्यास तयार होत नाही. अशा परिस्थितीत भूमकाल संघटनेने गावकºयांच्या मदतीतून या पुलाची उभारणी करण्याचा प्रस्ताव ठेवला. पोलिसांनीही तो मान्य करून सर्व ती मदत करण्याची हमी दिली. मात्र पूल उभारण्याची वेळ चुकली. अगदी पावसाळ्याच्या तोंडावर जेमतेम १८ ते २० दिवसांत हा पूल उभा करण्यात आला. त्यामुळे त्यात काही तांत्रिक चुकाही राहिल्या. ७ जूनला पुलाचे लोकार्पण झाल्यानंतर लगेच पावसाला सुरूवात झाली. काही दिवस वाहत्या पाण्यातही पूल तग धरून होता. मात्र सततच्या पावसात पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजुकडील रस्त्याला जोडणाºया बाजूची माती वाहून गेली. त्यामुळे पुलाचा मधल्या भागातील ढाचा कायम असला तरी दोन्ही बाजू खंडित झाल्याने पुलावर जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.प्रशासनाने बांधकाम विभागाच्या मदतीने पुलाची योग्य ती दुरूस्ती करून हा पूल लवकरात लवकर पुन्हा सुरू करावा आणि १५ ते २० गावांतील नागरिकांचा संपर्क पुन्हा जोडावा अशी अपेक्षा त्या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :riverनदीfloodपूर