शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भारिप सर्वसामान्यांसाठी संघर्षरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:04 IST

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही देशातील सर्वसामान्य व मागासवर्गीयांचे ज्वलंत प्रश्न सुटले नाही. देशातील सर्व जनतेला आवश्यक त्या सोईसुविधा समपातळीवर मिळाव्यात यासाठी भारिप-बहुजन महासंघ संघर्षरत आहे, .......

ठळक मुद्देअशोक सोनोने यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत भारिपचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही देशातील सर्वसामान्य व मागासवर्गीयांचे ज्वलंत प्रश्न सुटले नाही. देशातील सर्व जनतेला आवश्यक त्या सोईसुविधा समपातळीवर मिळाव्यात यासाठी भारिप-बहुजन महासंघ संघर्षरत आहे, असे प्रतिपादन भारिप बंमसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांनी केले.भारिप-बहुजन महासंघाचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा स्थानिक प्रेसक्लब भवनात शनिवारी घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे होते. प्रमुख अतिथी म्हणून अकोलाचे आमदार बळीराम सिरसकर, भारीपचे प्रदेश सरचिटणीस अमितभाई भूईजळ, कुशल मेश्राम, डॉ. सुरेश शेळके, प्रदेश निरिक्षक रोहिदास राऊत, बंडू नगराळे, जयदीप खोब्रागडे आदी उपस्थित होते.समाजातील तमाम शोषित, वंचित लोकांना सोबत घेऊन त्यांच्या हातात सत्ता देण्याचा यशस्वी प्रयोग बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यात केला. हा प्रयोग राज्याच्या इतर जिल्ह्यात पोहोचावा, यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे संघटन वाढवावे व आगामी निवडणुकींना सामोरे जावे, असे आवाहन सोनोने यांनी यावेळी केले. याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पुणेश्वर दुधे, कुलपती मेश्राम, नासीर जुम्मन शेख, सिताराम टेंभुर्णे, डाकराम वाघमारे, माला भजगवळी उपस्थित होते. संचालन प्रा. राजन बोरकर तर आभार हंसराज बडोले यांनी मानले.