शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

भामरागड जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

पर्लकोटा नदीला यावर्षी दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला. गुरूवारपासून पुराचे पाणी सतत वाढतच आहे. हे पाणी गावात शिरल्यामुळे भामरागड नागरवासीयांची व प्रशासनाचा चिंता वाढली आहे. शुक्रवारी भामरागडला बेटाचे स्वरूप आले. नगरातील बाजारपेठेतील दुकानांसह आंबेडकर नगर, शोभा नगरातील जवळपास १५० घरे जलमय झाली आहेत. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. मुसलमान टोल्यालाही पुराचा वेढा पडला आहे.

ठळक मुद्देचार तालुक्यात अतिवृष्टी : १० मार्गांची वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली, भामरागड, कुरखेडा : जिल्ह्याच्या उत्तर भागातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन अनेक ठिकाणच्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे ठेंगणे पूल पाण्याखाली जाऊन जवळपास १० मार्गांवरील वाहतूक खोळंबली आहे. विशेष म्हणजे दक्षिणेकडील भामरागड तालुक्यात २४ तासात जेमतेम १३.९ मिमी पाऊस झालेला असला तरी छत्तीसगडकडून येणाऱ्या नद्यांच्या दाबामुळे पर्लकोटा नदीवर दाब येऊन तिचे पाणी भामरागडमध्ये शिरले. त्यामुळे १५० पेक्षा जास्त घरांना पाण्याचा वेढा पडला आहे.शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार, २४ तासात सर्वाधिक १२९ मिमी पाऊस कुरखेडा तालुक्यात झाला. तसेच देसाईगंज तालुक्यात ९९ मिमी तर आरमोरी तालुक्यात ६६.५ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. त्यामुळे कुरखेडा आणि आरमोरी तालुक्यातही अनेक नाल्यांना पूर येऊन मार्ग अडले आहेत.पर्लकोटा नदीला यावर्षी दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला. गुरूवारपासून पुराचे पाणी सतत वाढतच आहे. हे पाणी गावात शिरल्यामुळे भामरागड नागरवासीयांची व प्रशासनाचा चिंता वाढली आहे. शुक्रवारी भामरागडला बेटाचे स्वरूप आले. नगरातील बाजारपेठेतील दुकानांसह आंबेडकर नगर, शोभा नगरातील जवळपास १५० घरे जलमय झाली आहेत. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. मुसलमान टोल्यालाही पुराचा वेढा पडला आहे. त्यामुळे पुरपीडित लोकांचे सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.प्रशासनातर्फे पूरग्रस्तांना राहण्याकरिता भगवंतराव आश्रमशाळा, समूह निवासी शाळा व इतर शासकीय इमारतीम्ांध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदार सत्यनारायण सीलमवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, नायब तहसीलदार अनमोल कांबळे, नगर पंचायत मुख्याधिकारी सुरज जाधव हे पूपरिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.मुस्लिम टोल्यातून गावात येण्याºया रस्त्यावर पाणी असल्याने त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी ग्रामीण रु ग्णालयाचे डॉ.कांबळे व त्यांच्या चमूने बोटच्या सहाय्याने जाऊन तिथे स्टॉल लावला व सर्वांची तपासणी केली.सध्या इंद्रावती नदी ही जगदलपूर (छत्तीसगड) येथे धोका पातळीच्या वर वाहात आहे. ही नदी भामरागड तालुक्यातील कवंडे गावातून प्रवेश करु न पुढे दक्षिण भागात सोमनूर येथे गोदावरी नदीला जाऊन मिळते. सध्या नदीची पाणी पातळी लक्षात घेता इंद्रावती नदीकिनाऱ्यावरील गावांनी विशेष सतर्कता बाळगावी. संबंधित तहसीलदारांनी आवश्यकता पडल्यास परिसरातील लोकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. गोसेखुर्द धरणामधूनही वेळोवेळी विसर्ग सुरू आहे.१२८ गावे संपर्काबाहेरभामरागड तालुक्यातील १२८ गावांचा तालुका मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटल्याने सदर गावांची काय परिस्थिती असेल याची माहिती प्रशासनाकडेही नाही. सध्या भामरागड-कोठी, भामरागड-आरेवाडा, भामरागड-नेलगुंडा, भामरागड-लाहेरी, भामरागड-मन्नेराजाराम असे सर्व मार्ग बंद आहेत. त्यामुळे त्या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या कोणताही पर्याय नाही.नागरिकांनी सतर्क राहावेसध्या गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाºया विविध नद्या-उपनद्या तसेच नजीकच्या जिल्ह्यातील धरणांमधून वेळोवेळी सोडले जाणारे पाणी जिल्ह्यातून वाहणाºया नद्या-नाल्यांच्या पातळीमध्ये वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य पूरपरिस्थितीवर उचित उपाययोजना करण्यासाठी संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.मेडिगड्डातील विसर्गामुळे गावांना धोकामेडिगड्डा बॅरेजमधून वेळोवेळी सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे (सध्या विसर्ग ४.२८ लक्ष क्युसेक्स) गोदावरी नदीच्या खालील भागातील गावांमध्ये विशेषत: कोतापल्ली, मद्दीकुंठा, चिंतरवेला, अंकिसा, आसरअल्ली, सुंकरअल्ली, मुथुपुरम, मुकडागट्टा, बोम्मेलकोंडा, सोमनूर इत्यादी गावांमध्ये विशेष दक्षता घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. इंद्रावती व गोदावरी नदीकिनारी असलेल्या गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर