शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड तालुक्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:35 IST

शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भामरागडसह तालुक्यात दमदार पाऊस झाला. जवळपास दोन तास मुक्काम ठोकत पावसाने भामरागड तालुक्याला झोडपून काढले. मुसळधार

ठळक मुद्देशनिवारी सायंकाळी दोन तास पडला पाऊस : शहरातील चौकाला आले बेटाचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भामरागडसह तालुक्यात दमदार पाऊस झाला. जवळपास दोन तास मुक्काम ठोकत पावसाने भामरागड तालुक्याला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे भामरागड येथील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते.छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्यामुळे या तालुक्यात दरवर्षी सर्वाधिक पाऊस पडते. यावर्षी सुध्दा भामरागड तालुक्यात सुरूवातीपासून दमदार पाऊस सुरू आहे. चार दिवसांपूर्वी पामुलगौतम नदीला अचानक पाणी वाढल्याने तीन महिला वाहून गेल्या होत्या. भामरागड तालुक्यातून पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या तीन नद्या वाहतात. सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने या तिन्ही नद्यांना जिल्ह्यातील इतर नद्यांच्या तुलनेत अधिक पाणी होते.भामरागड तालुक्यात मुख्यत: धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धानाचे पºहे टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. शेतकरी वर्ग आता दमदार पावसाची प्रतीक्षा करीत होता. शनिवारी झालेल्या पावसाने शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे रविवारपासून रोवणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.इतर ठिकाणी प्रतीक्षाजिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अजुनही पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे रोवणीच्या कामांना सुरूवात झाली नाही. अजुनही शेतकरी वर्ग दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशाच शेतकºयांनी रोवणी सुरू केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस