शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! चिचडाेह बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडणार; १ जूनपासून पाण्याचा विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2023 20:45 IST

Gadchiroli News यंदा १ जूनपासून पावसाळा सुरू हाेणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने पुढील धाेका ओळखून पाण्याची पातळी कमी करण्यासाठी चिचडाेह बॅरेजचे सर्वच ३८ दरवाजे १ जून राेजी उघडले जाणार आहेत.

गडचिरोली : गडचिराेली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ किमी अंतरावर अंतरावर चिचडोह बॅरेज आहे. सात महिन्यापूर्वी बॅरेजचे दरवाजे बंद केले हाेते. तेव्हापासून येथे भरपूर पाणीसाठा आहे. यंदा १ जूनपासून पावसाळा सुरू हाेणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने पुढील धाेका ओळखून पाण्याची पातळी कमी करण्यासाठी चिचडाेह बॅरेजचे सर्वच ३८ दरवाजे १ जून राेजी उघडले जाणार आहेत. याबाबत बॅरेज खालील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा चंद्रपूरच्या लघु पाटबंधारे विभागाने दिला.

चिचडाेह बॅरेजचे सर्व दरवाजे १५ ऑक्टोबर २०२२ राेजी बंद करण्यात आले होते. यावर्षी १ जूनपासून पावसाळा सुरू हाेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. लवकर पावसाळा सुरू झाल्यास पूर परिस्थिती निर्माण हाेईल. हा धाेका ओळखून बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व ३८ दरवाजे १ जून राेजी उघडण्याचे नियोजन आहे. पाणी साेडल्यास बॅरेजच्या निम्न भागातील नदीतील पाण्याची पातळी वाढेल. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहावे यासाठी लघु पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला. विशेष म्हणजे, बॅरेजचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झाले. मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजूस ४ किमी वर बॅरेज आहे. बॅरेजची एकूण लांबी ६९१ मीटर असून १५ मीटर लांब बाय ९ मीटर उंचीचे ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसविले आहेत.नागरिकांनी काय करू नये ?बॅरेजमधून पाणी साेडल्यानंतर पाणी पातळी वाढेल. परिणामी जीवित व वित्त हानी होऊ शकते. ही हानी हाेऊ नये यासाठी पाणी साेडण्याच्या कालावधीत नदी काठावर जाणे टाळावे, तसेच नदीकाठावरील शेतीत कामे करताना सतर्क राहावे. मार्कंडा देवस्थानात येणाऱ्या यात्रेकरुंनी नदीवर आंघोळ करताना खबरदारी घ्यावी, मासेमार, नदीघाटातून वाळू काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी कळविले.गडचिराेलीतील २१ तर चंद्रपूर जिल्ह्यातील १७ गावेगडचिराेली जिल्ह्यातील एकूण २१ तर चंद्रपूर जिल्ह्यातील १७ गावे वैनगंगा नदीच्या चिचडाेह बॅरेजच्या बाधित क्षेत्रात येतात. यामध्ये गडचिराेली तालुक्यातील डाेंगरगावसह अन्य तीन अशी चार गावे,तर चामाेर्शी तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे. वैनगंगा नदीकाठावरील दुसऱ्या बाजूच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील एकूण १७ गावांचा बाधित क्षेत्रात समावेश आहे.

टॅग्स :Waterपाणी