दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : देशात काेराेनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याची घाेषणा जागतिक आराेग्य संघटनेने केली आहे. भारतातही दुसरी लाट संपण्यापूर्वीच तिसरी लाट सुरू हाेण्याचा धाेका वर्तविला जात आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याचा आराेग्य विभाग सज्ज झाला असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेत सक्रिय काेराेना रुग्णांची संख्या ४ हजार ५०० पर्यंत पाेहाेचली हाेती. एवढ्या रुग्णांवर एकाचवेळी उपचार करताना आराेग्य यंत्रणेच्या नाकीनऊ आले हाेते. दुसऱ्या लाटेत जवळपास ६५० नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. सध्या जिल्ह्यात दुसरी लाटच सुरू आहे. मात्र दुसरी लाट संपण्यापूर्वीच तिसरी लाट येण्याचा धाेका वर्तविला जात आहे. भारतात डेल्टा रुग्णांच्या संख्येत वाढ हाेण्यास सुरुवात झाली आहे. तिसरी लाटही प्राणघातक ठरण्याची शक्यता असल्याने आराेग्य विभाग सजग झाला आहे. आवश्यक उपपाययाेजना करण्यास सुरूवात झाली आहे.
महिनाभरापासून रुग्णसंख्या १०० च्या वरचमागील महिनाभरापासून रुग्णांची संख्या १०० ते २०० च्या जवळपासच आहे. ती १०० पेक्षा अजूनही कमी झाली नाही. काही दिवस काेराेनामुक्त हाेणाऱ्यांपेक्षा काेराेनाबाधितांची संख्या अधिक राहते. ही स्थिती मागील महिनाभरापासून कायम आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास दुसरी लाट ओसरण्याअगाेदरच तिसऱ्या लाटेलाही सुरुवात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऑक्सिजन प्लांट पूर्णत्वाकडे- दुसऱ्या लाटेत काेराेना रुग्णांना माेठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत हाेती. ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्लांट जिल्हा रुग्णालयात बसविण्यात आला आहे. विद्युत पुरवठा व इतर कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ताे लवकरच सुरू हाेईल अशी माहिती आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा प्लांट सुरू झाल्यास आराेग्य विभागाला फार माेठा आधार ठरणार आहे.
२० टक्के बेड मुलांसाठी राखीव- गडचिराेली जिल्ह्यात २ हजार २०० पेक्षा अधिक बेड आहेत. यातील २० टक्के बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच ४८४ सेंट्रल ऑक्सिजन सिस्टिम असलेले बेड आहेत. तर २०० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर उपलब्ध आहेत. ऑक्सिजन बेडपैकी १० टक्के बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.