शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

समस्या मांडण्यासाठी एकजूट व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:28 IST

शिक्षकांच्या अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता शिक्षक परिषदेच्या वतीने वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : सिरोंचातील शिक्षक परिषदेच्या मेळाव्यात समस्यांवर चर्चा

ऑनलाईन लोकमत सिरोंचा : शिक्षकांच्या अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता शिक्षक परिषदेच्या वतीने वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. सदर समस्या मांडण्याकरिता शिक्षक परिषदेच्या सदस्यांनी एकजूट होऊन संघटन मजबूत करावे, असा सूर मान्यवरांनी सिरोंचा येथे शनिवारी आयोजित शिक्षक परिषदेच्या तालुका मेळाव्यात काढला.सिरोंचातील ए. पी. जे. अब्दुल कलाम चौकातील जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार होते. उद्घाटन धर्मराव कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम. बी. येगेवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ. नागो गाणार, प्रमुख अतिथी म्हणून कमलेश वाजपेयी, सल्लम चकीनारपू, गोपाल मुनघाटे, अविनाश तालापल्लीवार, सुभाष कुलसंगे उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य येग्गेवार म्हणाले, शासन विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना राबवित आहे. परंतु लाभासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे योजना प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी पालकांकडून कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. परंतु मिळणाºया लाभापेक्षा कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अधिक खर्च होतो. कमलेश वाजपेयी म्हणाले, शिक्षकांच्या समस्या शासनदरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी शिक्षक आमदार प्राधान्य देत आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांनी संघटना मजबूत करणे गरजेचे आहे. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. नागो गाणार म्हणाले, शिक्षकांनी आपल्या अडचणी, समस्या मांडाव्या. त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. प्रत्येक वेळी शासनाकडून पारित परिपत्रक त्यावर येणाºया अडचणी तसेच बदली प्रक्रिया करताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने बदली प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. बदली प्रक्रिया व जिल्ह्यातील २२० नियमबाह्य बदल्या यावरही त्यांनी विचार व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वी आ. गाणार यांनी येथील मेदाश्री कॉन्व्हेंटला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.संचालन खराबे, प्रास्ताविक व्ही. आईतवार यांनी केले. यशस्वीतेसाठी व्ही. व्ही. पडीशालवार, कलकोटवार यांच्यासह शिक्षक परिषदेच्या सदस्यांनी सहकार्य केले.