शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याबाबत गंभीर राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:12 IST

माणसाला शुद्ध पाणी मिळणे आरोग्य टिकविण्यासाठी गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांनी तसेच ग्रामस्थांनीसुद्धा पाणीपुरवठ्याबाबत संवेदनशील राहावे, ....

ठळक मुद्देकृषी सभापतींचे आवाहन : देसाईगंजात तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : माणसाला शुद्ध पाणी मिळणे आरोग्य टिकविण्यासाठी गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांनी तसेच ग्रामस्थांनीसुद्धा पाणीपुरवठ्याबाबत संवेदनशील राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे यांनी केले.स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत देसाईगंज पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी तालुकास्तरीय पाणीगुणवत्ता कार्यशाळा पार पडली. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी पं. स. सभापती मोहन गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशन पारधी, पं. स. सदस्य अशोक नंदेश्वर, शेवंता अवसरे, रेवाता अलोणे, अर्चना ढोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कटरे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी एस. डी. पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर केला पाहिजे, स्वच्छतेच्या सवयी पाळल्या पाहिजे, यामध्ये महिलांचा मोठा सहभाग असणे आवश्यक आहे, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. तसेच शुद्ध पाणी, शुद्ध परिसर, वैयक्तिक स्वच्छता, व्यवस्थापन, पर्यावरण व पारंपारिक ऊर्जा पारदर्शकता आदी विषयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस. एच. कटरे, आरोग्य सहायक दरडमारे, सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या उईके यांनी याप्रसंगी पाणीगुणवत्तेबाबत तांत्रिकदृष्ट्या मौलिक मार्गदर्शन केले.प्रास्ताविक स्वाती लांजेवार, संचालन अर्चना बडोले यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी पांडुरंग पेशने यांनी मानले. कार्यशाळेला सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आरोग्यसेवक व जलसुरक्षक हजर होते.गोदरीमुक्त ग्राम पंचायतींचा सत्कारसदर कार्यशाळेत हागणदारीमुक्त झालेल्या देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव, कसारी, डोंगरगाव, विसोरा, कुरूड या ग्राम पंचायतीचे सरपंच, सचिव यांना पारितोषिक, प्रमाणपत्र व ट्रॉफि देऊन सत्कार करण्यात आला.पाणी गुणवत्ता संनियंत्रण स्वच्छ भारत मिशन आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सांगड घालून देसाईगंज तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतींनी ही चळवळ प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जि. प. चे कृषी सभापती नाना नाकाडे, पं. स. सभापती मोहन गायकवाड, रोशनी पारधी, सुनीता मरस्कोल्हे व उमेशचंद्र चिलबुले आदींनी केले.