आॅनलाईन लोकमततळोधी मो. : आपल्या समाजावर व आपल्यावर अन्याय होत असल्यास संघर्ष करून न्याय मागण्याची चिकाटी वृत्ती तेली समाज बांधवांनी ठेवली पाहिजे. समाजाच्या भरवशावर अनेकांनी पदे हस्तगत केली. मात्र समाजाला दिशा देण्याचे काम पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही. यानंतर तरी दिशा देण्याच्या कामाला सुरूवात केली पाहिजे. ओबीसींना घटनेप्रमाणे आरक्षण मिळावे, यासाठी लढा सुरू असून दिल्ली येथे पुढील वर्षी महामेळावा घेतला जाईल. जिल्हा पातळीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन केले जातील, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.महाराष्टÑ प्रांतिक तेली समाज महासभा जिल्हा शाखा गडचिरोली तथा संत जगनाडे महाराज तेली समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संत जगनाडे महाराजांच्या पुतळ्यांचे अनावरण व समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी तळोधी मो. येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार तडस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्टÑ प्रांतिक तेली समाज महासभेचे प्रांतिक उपाध्यक्ष बबनराव फंड होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तेली महासंघाचे संस्थापक सदस्य विलास काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून बाबुराव कोहळे, प्रभाकर वासेकर, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, विलास निंबोरकर, माधुरी सुरजागडे, राजेश्वर बुरांडे, देवानंद कामडी, ज्ञानेश्वर रायमल, राजू बोरकर, सविता पिपरे, कविता किरमे, शशिकला चिळंगे, मुकरू खोब्रागडे, जयश्री दुधबळे, गंगाधर कुनघाडकर, नामदेव दुधबळे, अशोक वासेकर, जीवन वासेकर, भाष्कर वासेकर, उमाजी वासाडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना विलास काळे म्हणाले, आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढू, ओबीसीची जातनिहाय जनगणना करणे, क्रिमीलेअरची मर्यादा वाढवावी, ओबीसी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत प्रवेश द्यावा, जगनाडे महाराजांच्या नावाने महामंडळ स्थापन करावे यासाठी संघर्ष केला जाईल, असे मार्गदर्शन केले. बबनराव फंड यांनी मार्गदर्शन करताना एका जातीला आरक्षण देणे संविधानात बसत नसून आरक्षणासाठी न्यायालयात दाद मागितली जाईल. देशात ५२ टक्के ओबीसी समाज असतानाही आरक्षण अत्यंत कमी आहे. त्यामुळे बुध्दीवान विद्यार्थी खरपट आहेत. नोकरी मिळणे कठीण झाले आहे, असे मार्गदर्शन केले. जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना मेळाव्यांच्या माध्यमातून समाज बांधव एकत्र येतात. यामुळे समाजाची एकजूट होण्यास फार मोठी मदत होते. जिल्ह्यातील ओबीसींवर फार मोठा अन्याय होत आहे. यासाठी लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन रामेश्वर वासेकर, प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य रमेश बारसागडे तर आभार जितेंद्र कुनघाडकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी विनायक कुनघाडकर, सुदाम किरमे, मारोती बारसागडे, सुरेश बारसागडे, किशोर किरमे, साहिल कुनघाडकर यांच्यासह तळोधी येथील तेली समाज बांधवांनी सहकार्य केले.कार्यक्रमादरम्यान यांचा झाला सत्कारकार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, चामोर्शी पंचायत समितीचे सभापती आनंद भांडेकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश बारसागडे, चामोर्शी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम, पंचायत समिती सदस्य सुभाष वासेकर, उषा सातपुते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जगनाडे महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणसंत जगनाडे महाराज तेली समाज संघटनेतर्फे तळोधी येथे संत जगनाडे महाराज यांचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हाभरातून तेली समाजाचे शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी आरक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.
हक्कांसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:46 IST
आपल्या समाजावर व आपल्यावर अन्याय होत असल्यास संघर्ष करून न्याय मागण्याची चिकाटी वृत्ती तेली समाज बांधवांनी ठेवली पाहिजे.
हक्कांसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा
ठळक मुद्देरामदास तडस यांचे प्रतिपादन : तळोधी मोकासा येथे समाज प्रबोधन मेळावा व सत्कार सोहळा