शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पावसात विजा चमकताना सावधानता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:31 IST

पावसाळ्यात वीज कोसळून जीवित हानी घडण्याच्या घटना वाढतात. वीज कोसळू नये, यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. सावधानता बाळगल्यास स्वत:वर वीज कोसळण्याची शक्यता कमी होते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली आहे

ठळक मुद्देझाडाखाली थांबू नका : शक्यतो जवळपासच्या इमारतीचा आसरा घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्यात वीज कोसळून जीवित हानी घडण्याच्या घटना वाढतात. वीज कोसळू नये, यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. सावधानता बाळगल्यास स्वत:वर वीज कोसळण्याची शक्यता कमी होते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात वीज कोसळण्याचे प्रमाण सुद्धा अधिक आहे. काही नागरिक वादळाची चिन्हे दिसली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात व ऐनवेळी योग्य आसरा न मिळाल्याने जीवित हानी होते. विजा चमकत असताना शक्यतो लहान टेकडी, एकाकी झाड, झेंड्याचा खांब, प्रक्षेपण मनोरा यासारख्या उंच असलेल्या जागांचा आश्रय टाळावा. विजेपासून संरक्षण मिळण्यासाठी कोणतीही जागा पूर्ण सुरक्षित नसते. तरीही बंदिस्त इमारत, चारचाकी वाहन, ट्रक, बस, कार ही साधने बरीच सुरक्षित मानली जातात व आसरा घेण्यास काहीच हरकत नाही. वादळादरम्यान जनावरे झाडाखाली एकत्र गोळा होतात आणि विजेच्या कोसळण्याने एकाचवेळी अनेक जनावरांना प्राण गमवावा लागतो. वीज नेहमी सर्वात उंच जागेवर कोसळते. धातूची वस्तू जेवढी मोठी तेवढी वीज कोसळण्याची शक्यता जास्त असते. जेवढे झाड उंच तेवढा धोका अधिक असतो, त्यामुळे झाडापासून दूर राहावे.दळात घ्यावयाची काळजीवाछत्रा, कोयते, सुऱ्या, गोल्फ, खेळण्याची काठी अशा धातूंच्या वस्तू जवळ ठेवू नका. वीज चमकायला लागल्यास जमिनीवर बसा, दोन्ही पावले जमिनीवर ठेवा, पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडा आणि त्याभोवताल हातांचा विळखा घाला. हनुवटी गुडघ्यावर दाबून धरा. जंगलात असाल तर शक्य तो कमी उंचीच्या झुडूपांमध्ये लपण्याचा प्रयत्न करा, मोकळ्या जागेत असाल तर शक्यतो कडेकपारीमध्ये आसरा घ्या, पाण्यात असाल तर जमिनीवर यावे.मेघ गर्जना सुरू असताना हे करामेघ गर्जना सुरू असताना घराबाहेर असाल तर त्वरित आसरा शोधा, इमारत हा सर्वात सुरक्षित आसरा आहे. पण इमारत नसेल तर गुहा, खड्डा किंवा खिंडीसारख्या भागात आश्रय घ्या. उंच झाडे स्वत:कडे विजेला आकर्षित करीत असल्याने झाडाखाली कधीच थांबू नका. आसरा मिळाला नाही तर परिसरातील सर्वात उंच जागा टाळा, जवळपास फक्त उंचच झाडे असतील तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर थांबा, जमिनीवर वाका आणि बसून राहा. वादळाची चाहूल लागली तर शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. विजा चमकणे सुरू असताना विजेच्या सुवाहकांपासून दूर राहा. जर तुम्हाला विद्युत भारीत वाटत असेल म्हणजेच तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर गुडघ्यात मान घालून बसा.वीज पडली तर करावयाचा प्रथमोपचारजर तुमच्या आसपास एखाद्या व्यक्तीवर वीज पडली असेल तर त्याच्यावर त्वरित प्रथमोपचार करा. श्वासोच्छवास थांबला असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास नैसर्गिकरित्या सुरू होण्यास मदत होईल. हृदयाचे ठोके थांबले असल्यास सीपीआरचा उपयोग करावा. नाडीचा ठोका चालू असेल तर अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा याबाबत तपासणी व नोंद करा. दृष्टी ठिक आहे किंवा नाही, ऐकू येते किंवा नाही तसेच इतर हालचालींची नोंद घ्या.विजा चमकताना हे करू नकाविद्युत उपकरणे चालू करून वापरू नका. वादळात टेलिफोन, मोबाइलचा वापर टाळा, बाहेर असताना धातूंच्या वस्तूंचा वापर करू नका.

टॅग्स :Rainपाऊस