शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सावधान ! तुमच्याही घरावर पडू शकते चोरांची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 05:00 IST

शाळकरी मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. आता नोकरी करणाऱ्या पालकांनाही नवीन आठवड्यात सुट्ट्या मिळतील. त्यामुळे कर्मचारी वर्ग सहकुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी जातील. अशा वेळी घराला कुलूप लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. नेमकी हीच संधी हेरून चोरटे घरफोडी करण्याची शक्यता असते. अशा वेळी गावाला जाणार असाल तर शेजाऱ्याला घरावर नजर ठेवण्याची प्रेमळ सूचना अवश्य करा. अन्यथा चोरटे आपला कार्यभाग उरकून निघूनही जातील, ते गावावरून परत आल्याशिवाय काही कळणार नाही. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना काळातून सावरत असताना पहिल्यांदाच दिवाळीच्या सुट्ट्या मिळत आहे. त्यामुळे अनेकजण दिवाळी साजरी करण्यासाठी मूळ गावी किंवा कुठे पर्यटनाला जाण्याच्या तयारीत आहेत; पण असे घराला कुलूप लावून जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे; कारण कुलूपबंद घरांवर चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्यास सुट्ट्यांची मजा घेण्याऐवजी ती सजा ठरण्याची शक्यता आहे.शाळकरी मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. आता नोकरी करणाऱ्या पालकांनाही नवीन आठवड्यात सुट्ट्या मिळतील. त्यामुळे कर्मचारी वर्ग सहकुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी जातील. अशा वेळी घराला कुलूप लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. नेमकी हीच संधी हेरून चोरटे घरफोडी करण्याची शक्यता असते. अशा वेळी गावाला जाणार असाल तर शेजाऱ्याला घरावर नजर ठेवण्याची प्रेमळ सूचना अवश्य करा. अन्यथा चोरटे आपला कार्यभाग उरकून निघूनही जातील, ते गावावरून परत आल्याशिवाय काही कळणार नाही. काेराेनाकाळ सुरू झाल्यापासून अनेक लाेक सुट्या घेऊन पर्यटनाला गेले नाहीत. गेल्यावर्षी काेराेनामुळे अनेकांच्या सुट्या घरातच गेल्या. यावर्षी मात्र सुट्यांचा पुरेपूर आनंद घेण्याच्या मन:स्थितीत अनेकजण आहेत. त्यामुळे घराला अनेक दिवस कुलूप राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संधीचा फायदा घेत चाेरटे घरफाेडी करण्याची शक्यता असल्यामुळे अधिक दक्षता घेणे गरजेचे झाले आहे. 

दागिने घरी न ठेवलेलेच बरेबंद घरांमध्ये चोरटे कसा प्रवेश करणार याची कल्पना आपण करू शकत नाही. अशा वेळी चोरटे घरात शिरलेच तर घरात त्यांना मौल्यवान वस्तू, दागिने मिळू नये याची दक्षता घ्या. शक्यतो दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा सुरक्षितपणे सोबत न्या.

घराला कुलूप लावून जाण्यापूर्वी...-    घराच्या खिडक्या, सर्व दरवाजे चांगल्या पद्धतीने लावून घ्या. एखादा कोंडा किंवा ग्रिल कमजोर नाही ना, याची खात्री करा.-    घरातील गॅस रेग्युलेटरचा कॉक बंद करा. शक्य असल्यास घराच्या दर्शनी भागातील एखादा लाईट सुरू ठेवा.-    घराचे कुलूप मजबूत आहे याची खात्री करा. कुलूप चांगल्या दर्जाचे वापरा. कुलूप चांगल्या पद्धतीने लावले याची खात्री करा.

पोलीस वाढविणार गस्तलोक एकीकडे दिवाळीच्या सुटीचा आनंद घेत असताना दुसरीकडे पोलिसांना मात्र रात्रीचे जागरण करावे लागते. चोरट्यांचा डाव साध्य होणार नाही यासाठी गडचिरोली शहरातही रात्रीची गस्त वाढविली जाणार आहे.

नागरिकांनी घराला कुलूपबंद करून जाताना शेजाऱ्याला, घराजवळच्या ओळखीच्या लोकांना कल्पना द्यावी. किती दिवसांनी परत येणार हे त्यांना माहित असल्यास ते घरावर वेळोवेळी नजर ठेवू शकतील. शिवाय घरात कोणतेही मौल्यवान दागिने ठेवू नये. दागिने घरातल्यापेक्षा लाॅकरमध्ये अधिक सुरक्षित राहतील.- अरविंदकुमार कतलामपोलीस निरीक्षक, गडचिरोली

 

टॅग्स :Thiefचोर