शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, बिबट्या येऊ शकतो घरातही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 23:33 IST

पणतुजी उसेंडी (७० वर्ष) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ते आपल्या घरी नेहमीप्रमाणे झोपले असताना बिबट्याने त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. आरडाओरड केल्याने घरातील आणि शेजारच्या लोकांनी धाव घेतली असता बिबट्याने पळ काढला.  नातेवाइकांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली.

लाेकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आतापर्यंत जंगलात गेलेल्या इसमांवरच हल्ले करणारी श्वापदं आता चक्क गावात आणि घरात येऊन हल्ला करू लागली आहेत. आरमोरी तालुक्यातील कोरेगाव येथे आपल्या घरी झोपून असलेल्या इसमावर बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.पणतुजी उसेंडी (७० वर्ष) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ते आपल्या घरी नेहमीप्रमाणे झोपले असताना बिबट्याने त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. आरडाओरड केल्याने घरातील आणि शेजारच्या लोकांनी धाव घेतली असता बिबट्याने पळ काढला. नातेवाइकांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, वनपाल सोनुले, वनरक्षक धात्रक यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पणतुजी यांच्या चेहऱ्यावर खोलवर जखमा झाल्या आहेत. आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

वनविभागाचा दावा खोटा ठरविणारी घटना -    मनुष्य आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष हा केवळ जंगलातच होतो असे आतापर्यंत वनविभागाकडून सांगितले जात होते. पण या घटनेत बिबट्याने गावातच नाही तर चक्क घरात येऊन हल्ला केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आरमोरी तालुक्यात रोजच वाघ-बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. पण त्या रोखण्यासाठी वन विभाग कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. ही बाब शेतकरी वर्गासाठी चिंतेचा विषय झाली आहे.

 

टॅग्स :leopardबिबट्या