वाहतुकीचे नियम ताेडणाऱ्यांकडे अनेकवेळा पैसे राहत नाहीत. अशावेळी त्यांचे वाहन चालान केले जाते व चालानचा दंड पुढच्या काही दिवसात भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. मात्र अनेक वाहनचालक हा दंडच भरत नाही. गडचिराेली जिल्ह्यातील सुमारे १३ हजार वाहनचालकांकडे दंडाची रक्कम थकीत असल्याची माहिती आहे. ही रक्कम वसुलीसाठी आता वाहतूक पाेलीस कामाला लागले आहेत.
वाहन अडवून त्या वाहनावर जुना दंड आहे किंवा नाही हे तपासल्या जात आहे. ज्या वाहनावर जुना दंड थकीत आहे. त्याला नाेटीस बजावली जात आहे.
बाॅक्स
दंड भरा अन्यथा उपस्थित रहा
नाेटीसमध्ये म्हटले आहे की, दंडाच्या तडजोडपूर्व चर्चेकरिता दिनांक २३ सप्टेंबर राेजी गडचिरोली वाहतूक विभाग, गडचिरोली यांचे कार्यालयात हजर राहावे. त्यानंतर हे प्रकरण दिनांक २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पटलावर घेण्यात येईल. चालानमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिलेल्या लिंकवर प्रकरणातील तडजोडीची रक्कम अदा केल्यास वाहतूक कार्यालयात उपस्थित राहण्याची गरज नाही.