शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

दोन राज्यांतील नागरिकांची मने जोडतो बतकम्मा उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:22 IST

Gadchiroli : आकर्षक फुलांनी तयार केली जाते देवी, उत्सवाला सुरुवात

कौसर खान लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : महाराष्ट्राच्या टोकाला असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात तेलुगू भाषिक नागरिकांची संख्या मोठी आहे. येथील धार्मिक परंपरा दाक्षिणात्य परंपरेशी जोडलेली आहे. दरवर्षी साजरा होणारा बतकम्मा महोत्सव संपूर्ण जिल्ह्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

सिरोंचा तहसील तेलंगणा राज्याला लागून असल्याने येथील नागरिकांची परंपरा आणि सण साजरे करण्याची पद्धत पूर्णपणे दक्षिणेकडील आहे. दिवाळी आणि दसन्याप्रमाणेच येथील महिला बतकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात, दरवर्षी दसऱ्याच्या एक दिवस आधी म्हणजे नवमीला बतकम्मा उत्सव आयोजित केला जातो. बतकम्मा हे गौरीचे रूप मानले जाते. भाविकांच्या मते हा सण प्रामुख्याने महिलांच्या श्रद्धेशी संबंधित आहे. या दिवशी महिला विविध प्रकारची फुले गोळा करून भांड्यात फुलांपासून बतकम्मा देवीची प्रतिकृती तयार करतात. ही प्रतिकृती जितकी मोठी तितकी तिची जागा मोठी असते. 

बतकम्मा तयार केलेल्या प्रतिकृतीची मंदिरात नेऊन पूजा केली जाते. विविध प्रकारची भजनेही गायली जातात. या काळात मुलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. नऊ दिवस भाविकांची रेलचेल असते. 

अशी आहे बतकम्मा सणाची आख्यायिका हजारो वर्षांपूर्वी उत्तर तेलंगणातील एका जिल्ह्यातील घनदाट जंगलात काही राक्षसांनी कहर केला होता. परिसरात राहणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेशी ते खेळू लागले. काही स्त्रियांनी राक्षसांविरोधात आवाज उठवला आणि महान ऋषींना त्यांची दुर्दशा सांगितली. राक्षसांपासून सुरक्षित राहण्यासाठी ऋषींनी स्त्रियांना गौरी देवीची पूजा करण्याचा सल्ला दिला. मग त्या प्रांतातील स्त्रिया काही फुले गोळा करून पूजा करू लागल्या. यावेळी गौरी माता प्रसन्न झाली आणि त्यांनी महिलांना दर्शन दिले. राक्षसांना मारण्याचे वचन देऊन माता गौरीने राक्षसांना भूतबाधा केली. यानंतर महिलांनी आपल्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी माता गौरीची पूजा करण्यास सुरुवात केली.

अनेक वर्षांची उत्सवाची परंपरातेलुगू भाषेत गौरी देवीला बतकम्मा माता म्हणून ओळखले जाते. सिरोंचा तहसील पूर्णपणे तेलंगणा राज्याला लागून असल्याने येथील महिला गेल्या अनेक वर्षांपासून हा सण साजरा करत आहेत. या सणाला उपस्थित राहणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली