शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वनखी येथे घर कोसळून बापलेक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:30 IST

तालुक्यातील वनखी येथे घर कोसळून बापलेक घराच्या ढिागाऱ्याखाली दबल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन ढिगाºयाखाली दबलेल्या बापलेकांना बाहेर काढले.

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी ६ वाजताची घटना : एक तासाच्या प्रयत्नानंतर दोघांनाही मलब्यातून काढले बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील वनखी येथे घर कोसळून बापलेक घराच्या ढिागाऱ्याखाली दबल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन ढिगाºयाखाली दबलेल्या बापलेकांना बाहेर काढले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.दुधराम जांभुळे (५०) व किरण जांभुळे (२२) अशी जखमींची नावे आहेत. दुधराम व किरण हे आपल्या घरी झोपले होते. दरम्यान सकाळी ६ वाजताच्या दरम्यान दुधराम जांभुळे यांच्या घराला लागून असलेला भास्कर बावणे यांचा घर जांभुळे यांच्या घरावर कोसळला. त्यामुळे गाढ झोपेत असलेल्या दुधराम जांभुळे व त्यांचा मुलगा किरण हे दोघेही मातीच्या ढिगाºयाखाली दबल्या गेले. गावकºयांनी घटनास्थळी धाव घेऊन माती उपसली. एक तासाच्या प्रयत्नानंतर दोघांनाही बाहेर काढण्यात आले. नशिब बलवत्तर म्हणून दोघेही बापलेक वाचले. दोघांनाही गंभिर दुखापत झाली आहे. दुधराम जांभुळे यांचा एक पाय निकामी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पीडितांना शासनाकडून आर्थिक मदत, घरकूल व जीवनोपयोगी साहित्य द्यावी, अशी मागणी होत आहे. कोसळण्याच्या स्थितीत घर असल्याने बावणे यांनी त्यांचे घर अगोदरच पाडणे आवश्यक होते. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर घटना घडली.रेखेगाव व गुंडापल्लीत घर कोसळलेघोट परिसरातील रेखेगाव येथील दुर्गावाही कोलू तिम्मा यांच्या घराची अंशत: पडझड झाली. घराचे छत कोसळल्याने कवेलु, फाटे यांचे नुकसान झाले आहे. गुंडापल्ली येथील विलास नामदेव दुर्गे यांचा घराचा गोठा पावसाच्या पाण्यामुळे कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जीर्ण झालेली घरे पावसाळ्यापूर्वी पाडून टाकावी, असे आवाहन प्रशासनामार्फत केले जात असले तरी नागरिक कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे जीर्ण झालेल्या घरातही वस्ती करावे लागते.

टॅग्स :Rainपाऊस