शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी तरुणांनी जाळले नक्षलींचे बॅनर, बंदचे आवाहन धुडकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 14:25 IST

जारावंडी हद्दीतील मौजा जारावंडी ते मौजा कासनसूर मार्गावरील ताडगुडा  फाट्याजवळ नक्षलवाद्यांनी नक्षल सप्ताह पाळण्यासाठी लावलेले बॅनर आदिवासी तरुणांनी रविवारी जाळले.

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदत केंद्र (पोमके) जारावंडी हद्दीतील मौजा जारावंडी ते मौजा कासनसूर मार्गावरील ताडगुडा  फाट्याजवळ नक्षलवाद्यांनी नक्षल सप्ताह पाळण्यासाठी लावलेले बॅनर आदिवासी तरुणांनी रविवारी जाळले. नक्षल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी तरुणांनी नक्षलवाद्यांचे आवाहन धुडकावल्याने युवा वर्गात असलेला असंतोष पुन्हा एकदा दिसून आला.मौजा ताडगुडा व मौजा कसुरवाही  येथील आदिवासी तरुणांनी एकत्र येत नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर काढून त्याची होळी केली. यावेळी उपस्थित तरुणांनी नक्षलवाद मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्याचबरोबर नक्षलवाद्यांनी सप्ताह पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला विरोध असल्याचे तरुणांनी सांगितले. सप्ताहाच्या नावावर आदिवासी बांधवांची होत असलेली मुस्कटदाबी यापुढे आदिवासी तरुण खपवून घेणार नाही असे तरुणांनी सांगितले.गडचिरोली पोलीस दलाने अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान 'आदिवासी विकास सप्ताह' साजरा करण्याचे घोषित केले आहे. यामध्ये तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन,युवकांची खेळाची आवड लक्षात घेऊन त्याबाबत पाठवपुरावा, त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करणार आहे. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या नक्षल सप्ताहाला न जुमानता अनेक आदिवासी तरुणांनी  घराबाहेर पडून आपल्या व आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन गडचिरोली पोलीस दल ठिकठिकाणी राबवित असलेल्या 'आदिवासी विकास सप्ताहात' सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.