शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे बँक प्रगतीवर

By admin | Updated: December 7, 2014 22:50 IST

दुर्गम भाग, शैक्षणिक मागासलेपणा, पायाभूत सुविधांचा अभाव असे अनेक प्रश्न जिल्ह्यात कायम आहे. मात्र अशा विपरित परिस्थितीतही उत्कृष्ट बँकींग सेवा देऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा

गडचिरोली : दुर्गम भाग, शैक्षणिक मागासलेपणा, पायाभूत सुविधांचा अभाव असे अनेक प्रश्न जिल्ह्यात कायम आहे. मात्र अशा विपरित परिस्थितीतही उत्कृष्ट बँकींग सेवा देऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा राज्यातून उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँकेचा पुरस्कार मिळविला आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनामुळेच जिल्हा बँक प्रगतीच्या शिखरावर पोहोचली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आज रविवारला आयोजित उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, सचिव त्रियुगी नारायण दुबे, बँकेचे उपाध्यक्ष डॉ. बळवंत लाकडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार आदी मान्यवर उपस्थित होते. बँकींग सेवा क्षेत्र हे टीमवर्क आहे. या टीमला चांगला मार्गदर्शक लाभल्यामुळे जिल्हा बँकेची भरभराट होत आहे, असे गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. यावेळी प्रचिंत पोरेड्डीवार म्हणाले, जिल्हा बँकेच्या विकासात बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. जिल्हा बँकेची आणखी भरभराट होण्यासाठी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जिल्हा बँकेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते शहरी भागातील आरमोरी, सिरोंचा, कुरखेडा येथील बँक शाखांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण भागातील धानोरा, आलापल्ली व अमिर्झा या तीन शाखांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अतिदुर्गम विभागातील एटापल्ली, भामरागड, कसनसूर या शाखांना तसेच थकीत पीक कर्ज वसुली करणाऱ्या बँक निरिक्षकांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक सतिश आयलवार, संचालन अरूण निंबेकर यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)