शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

बांधेगावची शाळा तीन दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:58 IST

कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वारंवार गैैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. परंतु या प्रकाराकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त गावकºयांनी सोमवारी शाळेला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देशिक्षक गैैरहजर : पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनीच उघडली शाळा; पालकांनी ठोकले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वारंवार गैैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. परंतु या प्रकाराकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त गावकºयांनी सोमवारी शाळेला कुलूप ठोकले. मात्र शिक्षण विभागाकडून कोणतीच दखल घेतली नसल्याने बुधवारी तिसºयाही दिवशी शाळा बंद होती.तालुक्यातील बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून येथे दोन शिक्षक कार्यरत आहेत. अनेकदा एक शिक्षक तर कधी दोन्ही शिक्षक शाळेत गैरहजर राहत होते. अशी तक्रार पालकांनी पंचायत समितीला केली होती. परंतु पालकांच्या तक्रारची दखल घेण्यात आली नाही. दरम्यान सोमवारी नेहमीप्रमाणेच विद्यार्थ्यांनीच शाळा उघडली. मात्र शिक्षक हजर नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंगाट ऐकून पालकांनी शाळेत जाऊन पाहिले. शेवटी अनुपस्थित असलेल्या दोन्ही शिक्षकाची दुपारी दोन वाजेपर्यंत वाट पाहून अखेरीस शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. तरी या गंभीर बाबींची शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.शिक्षण विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी अथवा लोकप्रतिनिधींनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाही. परिणामी बुधवारी तिसºयाही दिवशी शाळा कुलूपबंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.दोन दिवसांचे वेतन कापणारबांधगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक गैैरहजर राहिल्याने या शिक्षकांचे दोन दिवसांचे वेतन कापले जाईल, असे जिल्हा परिषदचेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पी. उरकुडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक