लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड येथील शोभा नगरातील बलराम सुनील दास यांचे घर जळून खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.हनुमान जयंतीनिमित्त भामरागड येथे रात्री महाप्रसादाचे आयोजन केले होते. महाप्रसाद घेण्यासाठी गेले होते. तेव्हा अचानक घरातून धूर निघू लागल्याने शेजारच्या नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आग बाजुच्या घरांपर्यंत पसरली नाही. मात्र बलराम दास यांचे घर जळून खाक झाले. आग लागल्याची घटना माहित होताच भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील, ठाणेदार सुरेश मदने, पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी घटनास्थळ गाठले. तलाठी खरकाटे यांनी पंचनामा केला. सोन्याचे दागिणे, कपडे, जीवनावश्यक वस्तू, घराचे फाटे जळून एकूण २ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.गडचिरोलीत गॅरेज व चहाटपरीला आगगडचिरोली बसस्थानकाजवळ असलेल्या चहाटपरीमधील सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. आग लागल्याचे लक्षात येताच अग्नीशमन वाहन बोलविण्यात आले. मात्र चहाटपरी, पानठेला व दुचाकी दुरूस्ती दुकान जळून खाक झाले. दुरूस्ती दुकान चांदाळाचे सरपंच राजेंद्र मेश्राम यांचे आहे. तर चहाटपरी राजू नैताम यांची आहे. गॅरेजमधील सहा दुचाकी सुध्दा जळून खाक झाल्या.
भामरागड येथील घर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:15 IST
भामरागड येथील शोभा नगरातील बलराम सुनील दास यांचे घर जळून खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भामरागड येथील घर जळून खाक
ठळक मुद्देतीन लाख रूपयांचे नुकसान : सुदैवाने जीवितहानी टळली