मेघराज राऊत : पत्रकार भवनात बिरसामुंडा स्मृतिदिन व प्रबोधनगडचिरोली : बिरसामुंडा यांनी ब्रिटिश सरकारच्या व्यवस्थेविरोधात संघर्ष केला. त्याबरोबरच उच्च वर्णीयांकडून बहुजणांचे होणारे शोषण हाणून पाडले. बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी बिरसामुंडा यांनी संघर्ष केला. त्यामुळे त्यांचे विचार अंगिकारत बहुजन समाजाने क्रांती घडवावी, असे आवाहन बहुजन मुक्ती आंदोलनाचे विदर्भ अध्यक्ष मेघराज राऊत यांनी गुरूवारी केले. स्थानिक पत्रकार भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित शहीद बिरसामुंडा स्मृतिदिन व प्रबोधन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून राऊत बोलत होते. उद्घाटन राष्ट्रीय संघटक संगीत इंगळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन मुक्ती आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश डोंगरे होते. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ प्रभारी अरूण सरोदे, महासचिव सुधीर वालदे, महिला आघाडी अध्यक्ष शालिनी रायपुरे, पपीता जुनघरे, मीना सोेमकुवर, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक उपस्थित होते. कार्यक्रमात इयत्ता बारावीतील गुणवंत सौरभ अविनाश तुरे, प्रतीक अनिल भुरसे यांचा आई, बहिणीसह सत्कार करण्यात आला. केंद्र व राज्यात सत्ता बदल झाल्यापासून अनुसूचित जमाती, भटके, इतर मागासवर्गीय लोकांची नोकरीची दारे बंद झाली आहेत. त्यामुळे सर्वांनी एकजूट होऊन संघर्ष करण्यासाठी तयार व्हावे, असे आवाहन सुरेश डोंगरे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. कार्यक्रमाचे संचालन विदर्भ महासचिव सुधीर वालदे तर आभार पपीता जुनघरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र राऊत, महासचिव राजेंद्र मंडपे, सचिव नरेंद्र रायपुरे, कल्पना जनबंधू, वंदना रायपुरे, संतोष मशाखेत्री, शंभरकर, भडके व गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
बहुजन समाजाने क्रांती घडवावी
By admin | Updated: June 12, 2016 01:20 IST