शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवलिया साकारतो कोळशाने हुबेहुब चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 23:17 IST

चार वर्ग शिकून अक्षर ओळख असलेला डोंगरगाव येथील माधव वानोशा कुमरे हा देवीदेवता, व्यक्ती व इतर निसर्गसौंदर्याचे चित्र कोळशाच्या सहाय्याने अगदी पाच मिनिटात हुबेहुब रंगवतो.

संडे अँकर । अनेकांच्या घरावर दिसते कलाकृती; चित्रांनी निर्माण केली स्वत:ची ओळखप्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : चार वर्ग शिकून अक्षर ओळख असलेला डोंगरगाव येथील माधव वानोशा कुमरे हा देवीदेवता, व्यक्ती व इतर निसर्गसौंदर्याचे चित्र कोळशाच्या सहाय्याने अगदी पाच मिनिटात हुबेहुब रंगवतो. त्याच्याकडे असलेल्या अप्रतिम चित्रकलेच्या गुणाला व्यावसायिक दृष्टिकोन देता आला नाही. त्यामुळे तो परिस्थितीने अतिशय गरीब आहे. तरीही त्याने त्याच्या परिसरात माधव पेंटर अशी ओळख निर्माण केली आहे. जुनी सायकल, डोक्यावर टोपी घातलेला माधव गावात येताच माधव पेंटर आला रे, असा शब्द आपसूकच नागरिकांच्या तोंडातून निघते.गरीब परिस्थितीत जन्मून मोठा झालेल्या माधवने चित्रकला शिकण्याचे कोणाकडूनही धडे घेतले नाही. चित्र निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले महागडे साहित्य सुध्दा तो खरेदी करू शकला नाही. कोळशाच्या भरवशावर त्याने चित्रकलेचे वेड सांभाळले आहे. माधव हा अतिशय चांगले चित्र काढत असल्याने घराची एखादी भिंत रिकामी असल्यास त्यावर चित्र काढून देण्याचा आग्रह नागरिक करतात. आग्रहाखातर माधव घरमालक जो चित्र म्हणेल, तो चित्र हुबेहुब भिंतीवर रेखाटतो. विशेष म्हणजे, चित्र रेखाटण्यासाठी एखाद्या व्यक्तीने पाच-पन्नास रुपये हातावर ठेवले तर ठिक, नाही तर पैसे न विचारताच पुढे निघून जातो. मात्र चित्र काढण्यापूर्वी एका चित्राचे २० रुपये लागतील, असा टोला चित्र काढून मागणाऱ्याला अवश्य लगावतो.माधवच्या चित्रकलेने परिसरातील नागरिकांना मोहून टाकले आहे. डोंगरगाव परिसरात एखाद्याच्या घरावर कोळशाने काढलेले चित्र दिसून आल्यास ते चित्र माधवनेच काढले आहे, असे विश्वासपूर्ण परिसरातील नागरिक सांगतात. एवढी ओळख माधवच्या चित्रकलेने निर्माण केली आहे. चित्रकलेत माधव एवढा निपून आहे की, कोळशाने एकदा मारलेली रेषा पुन्हा पुसण्याची गरज पडत नाही. डोळ्याची पापनी व त्यावर काढलेले केस यामध्ये तसूभरही फरक जाणत नाही.माधवला नाटक व तमाशाचेही आहे वेडमाधवला चित्रकलेबरोबरच नाटक, तमाशाचेही वेड आहे. आरमोरी तालुक्यात कुठेही नाटक व तमाशा असला तिथे माधवची उपस्थिती अवश्य दिसून येते. नाटक व तमाशात संगीत साथ देणाºया व्यक्तींजवळची जागा ही माधवची ठरलेली जागा आहे.

टॅग्स :paintingचित्रकला